मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! दुचाकीला कट अन् तरुणाला आयुष्यातूनच उठवलं; नागपूर पुन्हा हादरलं

धक्कादायक! दुचाकीला कट अन् तरुणाला आयुष्यातूनच उठवलं; नागपूर पुन्हा हादरलं

दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन तरुणांमध्ये वाद झाला होता. राग अनावरण झाल्यानं आरोपीनं हे कृत्य केलं.

दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन तरुणांमध्ये वाद झाला होता. राग अनावरण झाल्यानं आरोपीनं हे कृत्य केलं.

दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन तरुणांमध्ये वाद झाला होता. राग अनावरण झाल्यानं आरोपीनं हे कृत्य केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 9 जानेवारी : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुचाकीला कट मारताना धक्का लागला. या वादातून चक्क तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या विजयनगर परिसरातून ही घटना समोर आली आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. लक्ष्मीनारायण उर्फ अजय थट्टू चंदानिया (वय वर्ष 21 रा. कामठी) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

अपघातस्थळी नेमकं काय झालं?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मीनारायण हा त्याच्या अन्य एका मित्रासोबत शहरातील विजयनगर परिसरातून दुचाकीवर जात होता. याचवेळी त्याच्या दुचाकीला कट मारण्याच्या नादात आरोपीच्या दुचाकीचा धक्का लागला. या अपघातामध्ये लक्ष्मीनारायण याच्या दुचाकीचं नुकसान झालं. त्यानंतर लक्ष्मीनारायण याने आरोपीकडे नुकसानभरपाईची मागणी केली. वाद वाढत गेला. या रागातून दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या तरुणाने लक्ष्मीनारायण याच्यावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली. या घटनेत लक्ष्मीनारायण याच्यासोबत असलेला दुसरा मित्र देखील गंभीर जखमी झाला आहे.

आरोपीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनय साहू असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो हमाली करतो. रविवारी विनय साहू याच्या पुतण्याचा वाढदिवस होता. तो आपल्या दुचाकीवरून केक आणण्यासाठी जात होता. याच दरम्यान त्याच्या गाडीचा धक्का हा लक्ष्मीनारायण याच्या दुचाकीला लागला. यावरून वाद सुरू झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या घटनेत विनय साहूच्या तोंडाला मार लागला. रक्त आल्यानं त्याने संतापाच्या भरात लक्ष्मीनारायण याच्यावर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात लक्ष्मीनारायण गंभीर जखमी झाला, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात विनय साहूला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली.

First published:

Tags: Crime, Crime news, Murder, Nagpur, Nagpur News