मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जिच्यावर विश्वास दाखवला तिनेच दगा दिला, कारागृहातून पळालेल्या गँगस्टरला नागपुरात अटक

जिच्यावर विश्वास दाखवला तिनेच दगा दिला, कारागृहातून पळालेल्या गँगस्टरला नागपुरात अटक

कुख्यात गँगस्टर आकाश ठाकूर याला पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. तो कुख्यात गँगस्टर राजा गौससोबत नागपूर कारागृहातून 2015 साली पळून गेला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Ajay Deshpande

नागपूर : कुख्यात गँगस्टर आकाश ठाकूर याला पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. तो कुख्यात गँगस्टर राजा गौससोबत नागपूर कारागृहातून 2015 साली पळून गेला होता. तेव्हापासून आकाश फरारच होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरण्याच्या नादात तो पोलिसांच्या तावडीत सापडला. आतापर्यंत पाच वाहने आणि तीन सोनसाखळी चोरल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

'असा' पकडला आरोपी 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  आकाश ठाकूर हा  कुख्यात गँगस्टर राजा गौससोबत नागपूर कारागृहातून 2015 साली पळून गेला होता. तेव्हापासून आकाश फरारच होता. पोलीस त्याच्या मागावर होते.  तो दुचाकी चोरी करून त्याच दुचाकीने चेन स्नॅचिंग करायचा. चेन स्नॅचिंग केल्यानंतर तो ती दुचाकी कुठेही सोडून द्यायचा. 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास धंतोली परिसरात असाच त्याने एका महिलेच्या गळ्यातील चेन चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तो पकडा गेला.

हेही वाचा :  आणखी एक 'श्रद्धा', पाच नराधमांकडून चिमुकलीवर वर्षभर अत्याचार

दुचाकी बंद पडली

चेन चोरी करत असताना आकाश ठाकूर याची दुचाकी बंद पडली. दुचारी बंद पडल्यामुळे त्याला पळून जाता आले नाही. तिथे जमलेल्या नागरिकांनी आकाश ठाकूर याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.  आरोपीने आतापर्यंत पाच वाहने आणि तीन चैन चोरल्याची कबुली दिली आहे.

First published:

Tags: Nagpur