मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागपुरकरांनो, ही संधी सोडू नका! आकाशगंगेच्या अद्भुत विश्वाचं घ्या मोफत दर्शन

नागपुरकरांनो, ही संधी सोडू नका! आकाशगंगेच्या अद्भुत विश्वाचं घ्या मोफत दर्शन

Nagpur News : नागपूरकरांना अवकाशातील गमती-जमती अनुभवण्याची मोफत संधी लवकरच मिळणार आहे.

Nagpur News : नागपूरकरांना अवकाशातील गमती-जमती अनुभवण्याची मोफत संधी लवकरच मिळणार आहे.

Nagpur News : नागपूरकरांना अवकाशातील गमती-जमती अनुभवण्याची मोफत संधी लवकरच मिळणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

    विशाल देवकर, प्रतिनिधी

    नागपूर, 30 मार्च : आकाशगंगेत लक्षावधी ग्रह ताऱ्यांचा समावेश असून दिवसागणिक त्यात अनेक स्थित्यंतरे घडत असतात. यातील काही घटना आपण उघड्या डोळ्यांनी देखील पाहू शकतो. आपल्या निसर्गचक्रातील होणारे हे बदल आणि एखादी खगोलीय घटनेकडे संपूर्ण जगातील खगोलशास्त्रज्ञांचं लक्ष असतं.

    खगोलीय घटना आणि रात्रीच्या आकाशात दिसणार्‍या असंख्य ग्रहांचे निरीक्षण सर्व सामान्यांना देखील करता यावे, आपली आकाशगंगा, त्यातील ग्रह, त्यातील महत्त्व इत्यादी विषयी माहिती सर्वसामान्यांना व्हावी या हेतूने नागपूरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रमन विज्ञान केंद्र आणि तारांगण आणि बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी हा कार्यक्रम होतोय. काटोल रोडवरील हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात  मोफत दुर्बिणीच्या साहाय्याने आकाशगंगा, ग्रह तारे इत्यादी सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे.

    गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेकडून खास गिफ्ट

    काय आहे हेतू?

    अवकाशात घडणाऱ्या खागोलाय घटनाबद्दल सर्व सामान्यांना कायम कुतूहल असते. मात्र त्यामागील शास्त्रीय कारण क्वचितच कुणाला माहिती असते. खगोल शास्त्रातील विविध अंगाची माहिती सर्व सामान्यांना व्हावी त्यासाठी स्काय गेझिंग इव्हेंट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात खगोलशास्त्रज्ञांद्वारे अस्ट्रो टॉक्स, आकाशगंगेत ग्रहतारे, खगोलीय वस्तूंशी संबंधित कथाकथन, अशा विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

    चंद्राचे खड्डे, खगोलशास्त्र क्रियाकलाप पाहण्यासाठी विशेष दुर्बिणी सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमच्या माध्यमातून नागपूरकरांना आकाश, तारे, ग्रह आणि इतर खगोलीय वस्तूंबद्दल जाणून घेण्याची मोठी संधी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निरीक्षणाची वेळ संध्याकाळी 06.30 ते 08.30 अशी असेल. हा कार्यक्रम वॉक इन तत्त्वावर आयोजित केला जाणार असल्याने या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

    दिव्यांग धीरजचा वर्ल्ड रेकॉर्ड, फक्त 13 दिवसांत श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल प्रवास, Video

     रामन सायन्स सेंटर, नागपूर आणि बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्काय गझिंग इव्हेंट हा कार्यक्रम भारतातील खगोल पर्यटनाला चालना देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे यामध्ये जास्तीत जास्त खगोलप्रेमी, विद्यार्थी आणि नागपूरकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.आकाश निरीक्षण कार्यक्रम हा हवामानाच्या अधीन आहे त्यामुळे अधिक माहितीसाठी 0712-2735800 वर संपर्क साधावा अशी माहिती रमन सायन्स सेंटर आणि प्लॅनेटेरियमनागपूरचे प्रकल्प समन्वयक अर्णब चॅटर्जी यांनी दिली.

    'ती' सर्वसाधारण घटना

    दरम्यान, सध्या अवकाशात 5 ग्रह एका रेषेत दिसत असल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. ते ग्रह एका रेषेत असले तरी ते दिसतील याची मात्र खात्री नाही. ही एक सर्व साधारण घटना असून ती दरवर्षी सातत्याने दिसत असते, वास्तव लक्षात घेऊनच आकाशाकडे बघा, असे आवाहन खगोल अभ्यासकांनी केले आहे.

    First published:
    top videos

      Tags: Local18, Nagpur