मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur : 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसची नागपुरात मेजवानी!

Nagpur : 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसची नागपुरात मेजवानी!

72nd Indian pharmaceutical congress

72nd Indian pharmaceutical congress

72व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे यजमानपद नागपूर विद्यापीठाला मिळाले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 21 जानेवारी : उपराजधानी नागपुरात तब्बल 41 वर्षांनंतर इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर  विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त वतीने 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस (आयपीसी)चे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन इमारतीच्या परिसरात हे आयोजन होत आहे. या कार्यक्रमात वैद्यकीय उपकरणे, मशिनरी, पुस्तकांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानीचा समावेश करण्यात आला आहे. 

72 व्या आयपीसीची संकल्पना गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी वैद्यकीय उत्पादने सहज प्राप्त करता येणे या विषयावर केंद्रित आहे. यात जेनक्रेस्ट इनकॉर्पोरेशन औषध निर्मिती उद्योगांमधील 20 पेक्षा अधिक अध्यक्ष, सीईओ आणि एमडी, संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह सुमारे दहा हजार प्रतिनिधी या काँग्रेससाठी एकत्र येत आहेत.

13 सिम्पोजियम, 39 व्याख्याने, 85 वक्ते

आयपीसीमध्ये वैद्यकीय उपकरणांचा एक्स्पो, ब्लॉक चेन तंत्रज्ञानावरील वैज्ञानिक सत्रे, विविध कार्यक्रम तसेच विविध विषयांवरील कॉन्क्लेव्ह होत आहेत. 13 सिम्पोजियम आणि पूर्ण सत्रांतर्गत 39 व्याख्याने असून, एकूण 85 वक्ते, रिसोर्स पर्सन येत आहेत.

वैद्यकीय उपकरणे, मशिनरी, पुस्तकांचा समावेश

यात फार्मा उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या भविष्यातील आस्थापनांसाठी, देशभरातील 200 हून अधिक प्रदर्शकांच्या सहभागासह एक मेगा फार्मा आणि यंत्रसामग्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एक्स्पोमध्ये प्रथमच वैद्यकीय उपकरणांचे स्टॉलदेखील असतील.

सीईओ कॉन्क्लेव्ह : शहराला गुंतवणुकीच्या संधी

परिषदेच्या उद्घाटनानंतर लगेचच 'सीईओ कॉन्क्लेव्ह' होईल. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सन फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप सांघवी, फायझर इंडिया एसीजी ग्रुपचे अजित सिंह यांच्याशी संवाद साधतील. भारत सीरम अॅण्ड व्हॅक्सीनचे डॉ. संजय नवांगुळ, इंडोको रिमेडिजच्या आदिती पाणंदीकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहतील. सीईओ कॉन्क्लेव्हचे समन्वयक रवलीन सिंह खुराना राहतील.

Nagpur : भलं मोठं झाड घरावर कोसळलं! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुटुंब बेघर Video

या कॉन्क्लेव्हमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि कोरिया सारख्या विविध देशांमधून आलेल्या सुमारे 27 सीईओंची  व्याख्याने आणि चर्चांचा समावेश आहे. फार्मा उद्योगाची एकंदर परिस्थिती, वैद्यकीय उपकरणे, लसींची परिस्थिती, फार्मा उद्योगातील महिलांचे योगदान, गुंतागुंतीचे जेनेरिक अशा फार्मा उद्योगाशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवर सीईओ मार्गदर्शन करतील.

विविध विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद

उद्घाटन सत्रानंतर अध्यक्षीय परिसंवादासोबतच 'मेडिकल डिव्हाईस इंडस्ट्री : व्हिजन २०३०', 'फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी आणि डीडीएसमधील प्रगती', 'डिजिटल थेरप्युटिक्स आणि रेग्युलेटरी अफेअर्स : डायनॅमिक्स, ड्रग डिस्कव्हरी : ब्रेकथ्रू आणि इमर्जिंग ट्रेंडिंग', 'ट्रान्सफॉर्मिंग इन्फेक्ट्स' या विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहेत. याशिवाय फार्मसी व्यवसाय : एफआयपी विकास उद्दिष्टे 'सीपीए आणि एएआयपीएस', 'कर्करोग संशोधन : ट्यूमर टार्गेटिंग आणि उपचार' या विषयावर चर्चासत्र, परिसंवाद होत आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी

प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, जावेद अली आणि नितीन मुकेश यांचे म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट आणि नागपुरातील फुटाळा येथे जगप्रसिद्ध फ्लोटिंग म्युझिकल फाउंटन शो या अंतर्गत होणार आहे.

First published:

Tags: Local18, Nagpur