नागपूर, 14 डिसेंबर: नागपूर (Nagpur) शहरातील बेलतरोडी याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी पहाटे 7 दरोडेखोरांनी एका घरात घुसून एका नव विवाहित दाम्पत्याला लुटलं (7 robbers enters in house and looted couple) आहे. दरोडेखोरांनी घरातील रोख रकमेसह अंगावरील सर्व दागिने लंपास (Theft ornaments and money) केले आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी घराच्या आवारात दारू पिऊन हैदोस घातला आहे. दरोड्याची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील चिंचभवन येथे पुनर्वसन केलेल्या परिसरात फिर्यादी मंगेश वांद्रे आपल्या पत्नीसोबत वास्तव्याला आहेत. मंगेश हे ट्रॅव्हल्सवर चालक असून त्याचं अलीकडेच तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. फिर्यादीची पत्नी स्नेहा या धंतोली येथील एका पतसंस्थेत नोकरी करतात. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर पती-पत्नी झोपी गेले होते. दरम्यान सोमवारी पहाटे तीनच्या दरोडेखोरांनी स्वयंपाकघराच्या दाराला छिद्र पाडून दाराची कडी उघडली. आणि सात दरोडेखोरांनी चाकू, तलावर घेऊन घरात प्रवेश केला
हेही वाचा-महिलेनं स्वत:च पुसलं कुंकू; वडिलांनीही दिली साथ, महाराष्ट्राला हादरवणारी घटना
घरात प्रवेश केल्यानंतर एका दरोडेखोराचा घरातील स्टूलला धक्का लागला. यामुळे ट्युलवर ठेवलेली औषधाची एक बाटली खाली पडली. वस्तू खाली पडल्याचा आवाज आल्याने स्नेहा यांनी आपले डोळे उघडले आणि त्यांना धक्काच बसला. त्यांच्यासमोर सात दरोडेखोर तलवार आणि चाकू घेऊन उभे होते. त्यांनी आरडाओरड केल्यास गळे चिरेल, अशी धमकी दिली.
हेही वाचा-चोरीसाठी घेतली रजा; औरंगाबादेतील तरुणाने 6 लाखांवर मारला डल्ला, पोलीसही चक्रावले
यानंतर दरोडखोरांनी स्नेहा आणि मंगेश यांच्या गळ्याला चाकू आणि तलवार लावून त्यांच्या अंगावरील दागिने, सोनसाखळी आणि रोकड लुटली. आरोपींनी दाम्पत्याचे मोबाइलदेखील हिसकावले. एवढेच नव्हे तर आरोपींनी घराच्या परिसरात दारू पिऊन हैदोस घातला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur, Robbery