नागपूर, 15 डिसेंबर: नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील पाचगाव याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील 5 भांवानी आपल्या आईची संपत्ती हडपून तिला वाऱ्यावर सोडलं आहे. मुलांनी दुर्लक्ष केल्यानं संबंधित 80 वर्षीय महिला कॅन्सर सारख्या भयावह आजाराने खितपत पडली आहे. पीडित महिलेला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर, पोटच्या लेकांनी तिची सर्व संपत्ती हडपून तिला मरण्यासाठी एका खोलीत सोडून दिलं आहे. गेली अडीच वर्षे नरक यातना भोगल्यानंतर, नातवानेच या घटनेचा वाचा फोडली आहे.
त्याने पत्रकार परिषद घेत आपल्या आजीची दुर्दैवी व्यथा सांगितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिराबाई हटवार असं संबंधित 80 वर्षीय वयोवृद्ध महिलेचं नाव आहे. त्यांना 5 मुलं आणि 1 मुलगी अशी एकूण सहा अपत्य आहेत. पीडित इंदिराबाई यांच्या कंबरेला अडीच वर्षांपूर्वी एक जखम झाली होती. जखमेकडं दुर्लक्ष केल्याने ही जखम वाढत गेली आणि याचं रुपांतर कर्करोगात झालं. कालांतराने ही जखम वाढत जाऊन त्यातून दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली.
हेही वाचा-सेक्ससाठी नकार दिल्याने गाठला क्रूरतेचा कळस, पत्नीला जिवंतपणीच दिल्या नरक यातना
त्यामुळे लेक आपल्या उपचार करतील या आशेपोटी इंदिराबाई यांनी आपल्या नावावरील सर्व संपत्ती पाचही लेकांच्या नावावर केली. कालांतराने त्यांचा आजार वाढत गेला. त्यामुळे इंदिराबाई यांना मानसिक आधाराची गरज असताना, लेकांनी तिला घरापासून दूर एका खोलीत नेऊन सोडलं. गेल्या अडीच वर्षांपासून हतबल आजी याच खोलीत पडून आहेत. त्यांना जागचं हलताही येत नाही. त्यांना नैसर्गिक विधीलाही जाता येत नाही.
हेही वाचा-दार बंद करत योगा टीचर महिलेसोबत नोकराचं अमानुष कृत्य; भयावह घटनेनं जालना हादरलं!
अशा अवस्थेत आई पोहोचली असताना, तिच्या पाचही लेकांनी मात्र तिला मरण्यासाठी सोडून दिलं आहे. काही दिवसांपासून नातूच या आजीची सेवा करत आहे. सेवा करतो म्हणून वृद्ध महिलेच्या लेकांनी त्याला काही वेळा शिवीगाळ देखील केली आहे. याप्रकरणी नातवाने पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केलं. अखेर नातवाने पत्रकार परिषद घेत, आपल्या आजीची व्यथा सर्वांसमोर मांडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.