मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रक्षाबंधनाला बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी भावाचा मालकाच्या घरात डल्ला, नागपुरातील धक्कादायक घटना

रक्षाबंधनाला बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी भावाचा मालकाच्या घरात डल्ला, नागपुरातील धक्कादायक घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पोलिसांनी सांगितले की, ही घटना ज्यादिवशी घडली त्यादिवशी वैसवारे हे बहिणीच्या घरी गेले होते.

  • Published by:  News18 Desk
नागपूर, 13 ऑगस्ट : नुकताच रक्षाबंधनाचा सण पार पाडला. मात्र, नागपुरातून या सणाच्या निमित्ताने एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक 24 वर्षीय तरुणाने आपल्या बहिणीला रक्षाबंधनाला गिफ्ट देण्यासाठी त्याच्या मालकाच्या चोरी केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आकाश वारती असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय 24 आहे. आरोपी याने ओमसाई नगरमध्ये लॉन्ड्री सेवा चालवणाऱ्या कमल वैसवारे यांच्या घरातून 1.4 लाख रुपये चोरले होते. या पैशांची तो आपल्या बहिणीला भेटवस्तू देणार होता. मात्र, त्याचा हा प्लान फसला आणि त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीही जरीपटका पोलीस ठाण्यात चोरीची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, ही घटना ज्यादिवशी घडली त्यादिवशी वैसवारे हे बहिणीच्या घरी गेले होते. आरोपी वारतीने त्याच ठिकाणी पैसे ठेवले होते जिथे घरमालक वैसवारे यांनी आपल्या घराच्या चाव्या ठेवल्या होत्या. वैसवारे निघून गेल्यानंतर वारतीने चावीचा वापर करुन घरात प्रवेश केला आणि तब्बल 1.4 लाख रुपयांची चोरी केली आणि फरार झाला. मात्र, शेजाऱ्याने वारती याला घरात प्रवेश करताना पाहिले होते. त्यानंतर त्यांनी वैसावारे यांना माहिती दिली. वैसवारे यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर कोराडी पोलिसांनी आरोपी वारती याला अटक केली. हेही वाचा - 200 ml पेट्रोल प्यायला अन् कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; नागपूरातील BCA च्या विद्यार्थ्याचा मृत्यू दुसरीकडे कोराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले की, वारतीने सुरुवातीला चोरी केली नाही, असे सांगितले. मात्र, नंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. "वारतीने सांगितले की त्याने आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे चोरले,", अशी माहिती शिंदे यांनी दिली.
First published:

Tags: Crime news, Nagpur

पुढील बातम्या