मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आईनं डोळ्यादेखत सोडला प्राण; खचलेल्या तरुणाने तलावात मारली उडी, नागपुरातील हृदय पिळवटणारी घटना

आईनं डोळ्यादेखत सोडला प्राण; खचलेल्या तरुणाने तलावात मारली उडी, नागपुरातील हृदय पिळवटणारी घटना

Crime in Nagpur: आईच्या आठवणीनं व्याकूळ झालेल्या तरुणानं नागपुरातील अंबाझरी तलावात (Ambazari lake) उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to commits suicide) केला आहे.

  • Published by:  News18 Desk

नागपूर, 13 डिसेंबर: आई आणि बाळाचं नातं हे जगातील सर्वात घट्ट नातं मानलं जातं. आपल्या बाळावर कसलंही संकट आलं तर आई आपला जीव धोक्यात घालून बाळाचा जीव वाचवते. पण आईचाच मृत्यू झाल्यानंतर बाळाची काय अवस्था होऊ शकते? याचा प्रत्यय नुकताच नागपुरात आला आहे. येथील एक तरुणाला आईचं निधन होऊन दोन महिने उलटल्यानंतरही, त्याला दु:खातून स्वत:ला सावरता आलं नाही. आईच्या आठवणीनं व्याकूळ झालेल्या तरुणानं नागपुरातील (Nagpur) अंबाझरी तलावात (Ambazari lake) उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to commits suicide) केला आहे.

पण त्याचवेळी अंबाझरी तलावाजवळ पोलीस असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी काही जलतरणपटूंच्या मदतीनं तरुणाला पाण्यातून बाहेर काढलं आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाची समजूत घालून त्याला वडिलांच्या ताब्यात दिलं आहे. आईच्या निधनामुळे तरुणाची झालेली अवस्था पाहून पोलिसांना देखील गहिवरून आलं.

हेही वाचा-नागपुरात हायप्रोफाइल SEX रॅकेटचा पर्दाफाश; सलूनमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार

खरंतर, नागपुरातील अंबाझरी तलावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच एका पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस पथक स्थानिक जलतरण पटूच्या मदतीने संबंधित मृतदेह बाहेर काढत होते. याचवेळी एका 20 वर्षीय तरुणाने तलावात उडी घेतल्याचं पोलिसांना दिसलं. उपस्थित पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जलतरणपटूच्या मदतीने तरुणाला पाण्यातून बाहेर काढलं आहे. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर, तरुणाने आईच्या आठवणीनं ढसाढसा रडायला सुरुवात केली.

हेही वाचा-संदीप शिंदे यांची लष्करी कॅम्पमध्ये आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडत संपवलं जीवन

संबंधित 20 वर्षीय युवकाच्या आईचा मृत्यू ऐन दिवाळीच्या दिवशी कारंजालाडजवळ एका अपघातात झाला होता. आईचा झालेला अपघात त्यानं आपल्या डोळ्यानं पाहिला होता. आईला डोळ्यादेखत प्राण सोडताना पाहिल्याने तरुणाला नैराश्य आलं होतं. गेल्या दोन महिन्यांपासून ते आईच्या आठवणीनं व्याकुळ झाला होता. त्यातूनच हा युवक रविवारी सकाळी घराबाहेर पडला होता. यानंतर त्याने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तरुणाची समजूत काढून त्याला वडिलांच्या ताब्यात दिलं आहे.

First published:

Tags: Crime news, Nagpur