Home /News /maharashtra /

आऊटिंगला गेलेले चौघे चप्पल धुवायला तलावात उतरले; काही मिनिटात दोघे गायब

आऊटिंगला गेलेले चौघे चप्पल धुवायला तलावात उतरले; काही मिनिटात दोघे गायब

मिहीर उके व चंद्रशेखर वाघमारे हे रविवारी दुपारी अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेले होते.

    नागपूर : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस होत आहे. (Rain in Maharashtra) यातच नागपुरातून एक वाईट बातमी समोर आली आहे. सकाळपासून पाऊस सुरू असल्याने (Rain in Nagpur) दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आऊटिंग करायला गेले होते. (Two Students death in Ambazari Lake) मात्र, त्यांचा नागपुरातील अंबाझरी तलावात (Ambazari lake nagpur) बुडून मृत्यू झाला. हे दोन्ही जण चप्पल धुवायला दोघे तलावात उतरले होते. मात्र, त्यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. मिहीर शरद उके (वय 20, इंदोरा) व चंद्रशेखर किशोर वाघमारे (वय 20, लष्करीबाग) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे दोन्ही मृत विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. काय आहे संपूर्ण घटना - मिहीर उके व चंद्रशेखर वाघमारे हे रविवारी दुपारी अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत अक्षय मेश्राम व प्रशिक भिडे हे त्यांचे दोन मित्रही होते. अंबाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या होत्या. त्यामुळे आपल्या चपला धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. याचवेळी मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. यावेळी पाण्याची खोली जास्त होती. त्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे ते बुडाले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. हेही वाचा - Nagpur Crime : वृद्धांनी ATM वापरताना काळजी घ्या; नागपूरात हातचलाखीने 81 वर्षीय आजोबांचे 40 हजार लांबवले त्यांच्या मित्रांनी तेथील नागरिकांनाही आरडाओरड करत मदतीला बोलावले. मात्र, काही फायदा झाल नाही. तोपर्यंत उशीर झाला होता आणि दोघांच्याही नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अक्षय व प्रशिकने लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाची माहिती दोघांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आली. घटनेची माहिती कळताच दोघांच्याही नातेवाइकांना प्रचंड धक्का बसला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nagpur News

    पुढील बातम्या