मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूर: आधार कार्डसाठीच्या एका अर्जाने परत मिळवून दिली आपली माणसं; ते 16 बेपत्ता लोक अखेर घरी पोहोचले

नागपूर: आधार कार्डसाठीच्या एका अर्जाने परत मिळवून दिली आपली माणसं; ते 16 बेपत्ता लोक अखेर घरी पोहोचले

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मराठे म्हणाले, आधार केंद्रांत कार्ड तयार करण्यासाठी आलेल्या या व्यक्तींची कार्ड रिजेक्ट झाल्यावर ते आमच्याकडे आले. मलाही तिच शंका आली की बायोमेट्रिक माहिती इतर कार्डाशी जोडली गेल्याने यांचे अर्ज रिजेक्ट होत असावे, पण...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर 29 ऑगस्ट : आधार कार्ड (Aadhaar Card) हे भारतीय नागरिकाचं ओळखपत्र आहे. त्यासाठी हाताच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बाहुल्यांचे फोटो ऑनलाईन सिस्टिममध्ये नोंदवले जातात, जेणेकरून एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असल्या तरीही त्यांच्या बायोमेट्रिक (Biometric Information) म्हणजे शारीरिक वैशिष्ट्यांमुळे त्यांच्यातील वेगळेपण सिद्ध होऊ शकेल. हा जरी या नोंदणीचा मूळ उल्लेख असला तरीही या बायोमेट्रिक माहितीमुळे नागपूरमधील आधार नोंदणी केंद्राचे व्यवस्थापक (Manager) मानद कॅप्टन अनिल मराठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेपत्ता झालेल्या 16 व्यक्तींची त्यांच्या कुटुंबियांशी गाठ घालून दिली आहे. त्यात एका दिव्यांग मुलाचाही समावेश आहे. तसंच आणखी 16 व्यक्तींच्या कुटुंबियांशी ते संपर्क साधत आहेत. याबाबतचं वृत्त ‘दी इंडियन एक्सप्रेस’नं दिलं आहे.

लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती असे 16 जण बेपत्ता झाल्यानंतर नव्या पालकांसोबत किंवा एखाद्या एनजीओच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये (Rehabilitation) राहत होते. त्यांनी आधार कार्ड नोंदणीसाठी अर्ज केले होते. मात्र त्यांचे अर्ज आधार यंत्रणेकडून वारंवार रिजेक्ट झाले.

गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टने वेधलं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष, म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शोचे फोटो व्हायरल

नागपुरातल्या मनकापूर भागातील आधार सेवा केंद्रातील (Aadhaar Seva Kendra) अधिकाऱ्यांना वाटलं की या 16 व्यक्तींची बायोमेट्रिक माहिती आधीच कुठल्या आधार कार्डाशी जोडलेली असल्याने त्यांचे नवे अर्ज स्वीकारले जात नसावेत. पण या केंद्राचे प्रमुख मराठे यांनी मात्र या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचं ठरवलं आणि 16 जणांची त्यांच्या कुटुंबियांशी गाठ घालून दिली.

मराठे म्हणाले, ‘ आधार केंद्रांत कार्ड तयार करण्यासाठी आलेल्या या व्यक्तींची कार्ड रिजेक्ट झाल्यावर ते आमच्याकडे आले. मलाही तिच शंका आली की बायोमेट्रिक माहिती इतर कार्डाशी जोडली गेल्याने यांचे अर्ज रिजेक्ट होत असावे. मी आधारच्या मुंबईतील विभागीय आणि बेंगळुरूतील टेक्नॉलॉजी सेंटरकडे (regional Aadhar centre in Mumbai and the technology centre in Bengaluru) या केसेस पाठवल्या. त्यातून या 16 जणांची इत्यंभूत माहिती आम्हाला मिळाली आणि मग त्यांच्या मूळ कुटुंबाशी आम्ही त्यांची भेट घडवून आणली.’

Twin Tower Demolition : टॉवर पडल्यानंतर पुढं काय होणार, 'ही' कामं पूर्ण करण्यासाठी लागणार 3 महिने

ते म्हणाले, ‘ एका 18 वर्षांच्या दिव्यांग मुलाने 12 वीच्या परीक्षेसाठी लागेल म्हणून आधार नोंदणीसाठी अर्ज दिला. सध्या तो त्याला दत्तक घेललेल्या पालकांसोबत राहत होता. पण त्याचं कार्ड अनेकदा रिजेक्ट झालं. नंतर शोध घेतल्यावर कळालं की त्या मुलाचं मूळचं नाव मोहम्मद आमीर असून तो 8 वर्षांचा असताना मध्य प्रदेशातील जबलपूरच्या रेल्वे स्टेशनवर (Railway Station) आढळला होता. त्याला त्यावेळी अनाथाश्रमात ठेवण्यात आलं पण तिथंही अडचण निर्माण झाल्यानंतर सुप्रिंटेंडंट समर्थ दामले यांनी या मुलाला आपल्या घरी नेलं आणि दोन मुलांसह त्याचाही सांभाळ केला. 2021 मध्ये 12 वीची परीक्षा देण्यासाठी तो आधार कार्ड काढायला आल्यावर त्याच्या पूर्वआयुष्याचा उलगडा झाला. त्यानंतर मी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांची भेट घडवून आणली.’

कॅप्टन मराठेंसारखी अनेक मंडळी समाजाच्या हितासाठी कार्यरत आहेत पण आधारसारखी यंत्रणाही त्या कामी किती उपयुक्त ठरू शकते हे या बातमीतून सिद्ध झालं आहे.

First published:

Tags: Aadhar card, Nagpur News