मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमरावती : 'प्रहार' नेत्याच्या मुलीच्या साखरपुड्यातील जेवणातून 150 जणांना विषबाधा

अमरावती : 'प्रहार' नेत्याच्या मुलीच्या साखरपुड्यातील जेवणातून 150 जणांना विषबाधा

जेवणातून विषबाधा

जेवणातून विषबाधा

साखरपुड्याच्या जेवणातून तब्बल दीडशे लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील जीवनपुरा गावात हा प्रकार घडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India
  • Published by:  Ajay Deshpande

अमरावती, 5 डिसेंबर : साखरपुड्याच्या जेवणातून तब्बल दीडशे लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील जीवनपुरा गावात हा प्रकार घडला आहे. जीवनपुरा येथील रहिवासी असलेले प्रहाराचे पदाधिकारी, माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या मुलीचा साखरपुडा होता. या कार्यक्रमात जेवलेल्या लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. जेवणानंतर जवळपास शंभर ते दीडशे नागरिकांना मळमळ, उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या सर्व नागरिकांना उपचारासाठी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

उपजिल्हा रुग्णालयात उपचार  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अचलपूरच्या जीवनपुरा येथील रहिवासी अनिल पिंपळे यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. अनिल पिंपळे हे माजी नगरसेवक आहेत, तसेच ते प्रहारचे पदाधिकारी देखील आहेत. त्यामुळे या साखरपुड्याला नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर नागरिकांनी जेवण केलं. मात्र थोड्याचवेळात त्यांना मळमळ, उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. जवळपास  शंभर ते दीडशे नागरिकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यातील काही जणांना अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :  पालघर हादरले, 21 वर्षीय नराधमाचा 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; आरोपीला अटक

प्रकृती धोक्याबाहेर  

साखरपुड्यासाठी आलेल्या नागरिकांना जेवणानंतर अचानक  मळमळ, उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवानं या घटनेत कोणीही जीवितहानी झाली नसून, आता सर्वंची प्रकृती धोक्याबाहेर आहे.  सध्या उपजिल्हा रुग्णालयात 52 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ मुरले यांनी दिली आहे.

First published:

Tags: Amravati