नागपूर 28 नोव्हेंबर : राज्यात चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता नागपूरमधूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात सराफा व्यापाऱ्याकडून 14 लाख रूपये उकळले गेले आहेत. केंद्रीय तपास संस्थेचे अधिकारी असल्याची भीती दाखवून सराफा व्यापाऱ्याकडून 14 लाख उकळल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे.
चोराने मारला 'चौकार', नकली पिस्तुल दाखवून लुटले 15 तोळे सोनं!
इतवारीतील एका सराफा व्यापाऱ्याने कोलकत्तामधून 2 किलो सोनं मागवलं होतं. सोनं नागपुरात येताच चार ते पाच जणांनी त्यांना अडवलं आणि पण केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचं सांगितलं. यानंतर सराफा व्यापाऱ्याला असं सांगून थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.
सोनं खरेदीचा दस्ताऐवज नसल्याने घाबरलेल्या व्यापाऱ्याने एका व्यापारी मध्यास्थाच्या मदतीने हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यापाऱ्याने 14 लाख रुपये देऊन सोनं सोडवलं. मात्र, आता केंद्रीय तपास यंत्रणा नाही तर स्थानिक पोलिसांनीच हे सोनं पकडलं असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांकडून गुप्तपणे या प्रकरणाचा तपास सुरू आहे..
भुयार खोदून केली रेल्वे इंजिनची चोरी; लोखंड चोरांच्या सुळसुळाटामुळे पोलीस त्रस्त
नकली पिस्तुल दाखवून 15 तोळे लुटले -
नुकतीच अशीच आणखी एक घटना मुंबई जवळील नालासोपारा शहरातील पश्चिमेकडील पाटणकर पार्क - परिसरातून समोर आली होती. यात एका ज्वेलर्सच्या दुकानातून भरदिवसा नकली पिस्तुल दाखवून अंदाजे 15 तोळे सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांना घटनेची माहिती घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे . शनिवारी दुपारी पावणे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान दुकान मालक एकटेच असताना दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपीने दुकानात प्रवेश केला. दुकान मालकाशी बोलणे सुरू केले आणि बहीण येत असल्याचे सांगून दागिने पाहू लागला. त्याचवेळी त्याने हातात असलेले पिस्तूल काढून त्यांना दाखवले आणि दागिने लुटले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur News, Theft