मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पतंगाच्या मागे धावत होता समोरून रेल्वे आली अन्.., अंगावर काटा आणणारा अपघात

पतंगाच्या मागे धावत होता समोरून रेल्वे आली अन्.., अंगावर काटा आणणारा अपघात

पतंग पकडण्याच्या नादात हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या रेल्वेने धुव्रला धडक दिली.

पतंग पकडण्याच्या नादात हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या रेल्वेने धुव्रला धडक दिली.

पतंग पकडण्याच्या नादात हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या रेल्वेने धुव्रला धडक दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 15 जानेवारी :  मकर संक्रातीनिमित्त सर्वत्र पतंग उडवले जातात. आकाशात पतंगांची गर्दी पहायला मिळते. मात्र दरवर्षी या पतंगांमुळे अनेक अपघात देखील होत असतात. पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे दुखापत झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसंच पतंग उडवताना छतावरून खाली कोसळल्याच्या देखील काही घटना समोर आल्या आहेत. अशीच एक काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ध्रुव धुर्वे असं या 13 वर्षीय मुलांचं नाव आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.   

रेल्वेच्या धडकेत मृत्यू  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पतंगाच्या मागे धावताना रेल्वेच्या धडकेत 13 वर्षांच्या ध्रुव धुर्वे यााच मृत्यू झाला आहे.  ध्रुव धुर्वे हा कुंभार टोली परिसरात राहात होता.  सध्या जिकडे तिकडे पंतग उडवणे सुरू असून, पतंग पकडण्याचा नादात ध्रुव धावत होता. मात्र रेल्वे रूळ क्रॉस करताना समोरून येणाऱ्या रेल्वेकडे त्याचे लक्ष गेले नाही आणि त्याला यशवंत एक्स्प्रसने जोराजी धडक दिली. या अपघातामध्ये ध्रुवचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : एका फोनवर त्याने जळगाव गाठलं; मुलासोबत आरोपीचं भयानक कांड, जिल्हा हादरला

पतंग पकडण्याच्या नादात मृत्यू  

पतंग पकडण्याच्या नादात हा अपघात झाला. ध्रुवला रेल्वेने धडक दिली. या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. घरातील सर्व मंडळी कामानिमित्त घराच्या बाहेर असताना हा अपघात झाल्याचं ध्रुवचे वडील प्रवीण धुर्वे यांनी सांगितलं. या घटनेनं कुटुंबावर शोककळा पसरील असून, नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Nagpur, Nagpur News