अनैतिक संबंधाचा पतीला आला राग, पत्नीसह प्रियकराचा केला खेळ खल्लास

अनैतिक संबंधाचा पतीला आला राग, पत्नीसह प्रियकराचा केला खेळ खल्लास

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.

  • Share this:

नागपूर, 27 जुलै: शहरात कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेऊन दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर आज पुन्हा अनलॉक करण्यात येणार असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणानं आपल्या पत्नीसह एका तरुणाची हत्या केल्यानं नागपूर हादरलं आहे. ही घटना बेसा परिसराच्या कल्यानेश्वर नगर इथे घडली आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला आला. त्यातून पती-पत्नीमध्ये रोज खटके उडायला लागले होते. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पतीनं पत्नीसह प्रियकराची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे नागपूर शहर हादरलं असून मोठी खळबळ उडाली आहे.

हे वाचा-BREAKING: पंढरपूर भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिले आहेत. अहवाल आल्यानंतर तपासाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. दरम्यान पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पतीनं पत्नी किरण बरमेया आणि प्रेमी शिवची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी पती भारत बरमेयला पोलिसांनी अटक केली असून सध्या कसून चौकशी सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 27, 2020, 9:29 AM IST

ताज्या बातम्या