महाराष्ट्राचा महासंग्राम : नागपूर पश्चिम मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष

नागपूर शहरातल्या इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत नागपूर पश्चिममध्ये नेहमीच इच्छुकांची गर्दी जास्त असते. गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे सुधाकर देशमुख इथले आमदार असले तरी यावेळी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी यादी आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 04:46 PM IST

महाराष्ट्राचा महासंग्राम : नागपूर पश्चिम मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष

नागपूर, 20 सप्टेंबर : नागपूर पश्चिम मतदारसंघ व्हीआयपी मतदारसंघ आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक व्हीआयपी इथे राहतात. 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना होऊन नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातला काही भाग वेगळा झाला आणि नागपूर दक्षिण-पश्चिम हा नवा मतदारसंघ तयार झाला. त्यामुळे 2009 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढले आणि विजयी झाले.

भाजपने 2009मध्ये सुधाकर देशमुख यांना संधी दिली. सुधाकर देशमुख यांनी 2009 आणि 2014 मध्ये विजय मिळवला. 2009 च्या निवडणुकीत सुधाकर देशमुख यांच्याविरुद्ध काँग्रेसचे अनिस अहमद अवघ्या 1 हजार 980 मतांना पराभूत झाले. पण 2014 मध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी त्यांचा 26 हजार 402 मतांनी पराभव केला.या मतदारसंघात सलग 6 वेळा भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे पुन्हा सातव्यांदा भाजप विजयी होतो का असाच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते नितीन गडकरी यांना नागपूर पश्चिम मतदारसंघात 27 हजार 252 मतांची आघाडी मिळाली. मात्र, 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांचं मताधिक्य नागपूर पश्चिममध्ये काही अंशी घटलं आहे. ही सुद्धा भाजपसाठी काहीशी चिंतेची बाब आहे.

'भाई पण नाही छोटा अन् मोठाही नाही',कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ

नागपूर शहरातल्या इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत नागपूर पश्चिममध्ये नेहमीच इच्छुकांची गर्दी जास्त असते. संमिश्र स्वरुपाच्या जातीय, सामाजिक, भाषिक समीकरणामुळे निवडणुकीची गणितंही बदलतात. गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे सुधाकर देशमुख इथले आमदार असले तरी यावेळी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी यादी आहे.

Loading...

सुधाकर देशमुख हे विद्यमान आमदार आहेत पण भाजप इथे उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौर नंदा जिचकार, भूषण शिंगणे, जयप्रकाश गुप्ता, दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल असे काहीजण इच्छुक आहेत. राज्यमंत्री परिणय फुके यांचंही नाव इथे चर्तेत आहे.

काँग्रेसमधून विद्यमान शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना उमेदवारी हवी आहे. त्यांच्याशिवाय नरेंद्र जिचकार, नगरसेवक नितीश ग्वालबंशी, संदेश सिंगलकर असे युवा नेतेही रांगेत आहेत.

या मतदारसंघात बसपाची भूमिकाबी महत्त्वाची आहे. सध्या तरी बसपामधून सुभाष सरोदे आणि अविनाश बडगे ही नावे चर्चेत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अजून स्पष्ट नाही.

2014 विधानसभा निवडणूक निकाल

सुधाकर देशमुख, भाजप - 86 हजार 500

विकास ठाकरे, काँग्रेस – 60 हजार 98

================================================================================================

SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...