नागपुरात खर्रा खाऊन थुंकणाऱ्यांनो सावधान, गुन्हा होईल दाखल

नागपुरात खर्रा खाऊन थुंकणाऱ्यांनो सावधान, गुन्हा होईल दाखल

खर्रा खाऊन रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि सरकारी कार्यालयातमध्ये थुंकण्याच्या किळसवाण्या प्रकाराविरोधात नागपूर पोलिसांनी दंड थोपटले आहेत.

  • Share this:

नागपूर, 25 आॅगस्ट : नागपूर म्हटलं की खर्रा शौकीन हे समीकरण आपोआपच जुळतं. मात्र आता नागपुरात खर्रा खाऊन थुंकणं खर्रा शौकिनांना महागात पडणार आहे. खर्रा खाऊन रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि सरकारी कार्यालयातमध्ये थुंकण्याच्या किळसवाण्या प्रकाराविरोधात नागपूर पोलिसांनी दंड थोपटले आहेत. खर्रा आणि पान खाऊन थुंकणाऱ्या 17 जणांविरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केलीये.

अनेक वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाणारे नागपूर खर्रा ( मावा) शौकिनांमुळेही सर्वपरिचित आहे. मात्र, आता खर्रा, पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणं महागात पडणार आहे. कारण नागपूर पोलिसांनी खर्रा, पाण खाऊन थुंकणाऱ्यांविरूद्ध मोहिम उघडलीय. त्यामुळं खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार आहे.

नागपुरात रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि सरकारी कार्यालयांमध्ये सर्वत्र लाल रंगाचे डाग दिसतात. हे डाग नागपुरातची ओळख होत चाललीय. कारण नागपुरात खर्रा खाणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड आहे. जणु नागपूरचं हे खाद्यच आहे. खर्रा खाल्ल्यावर थुंकण्यासाठी जागाही हवी.

मग रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि सरकारी कार्यालयं अशा हक्‍काच्या ठिकाणांवर पिचकाऱ्या सोडल्या जातात. दुचाकीवर जाताना हेल्मेट वर करून थुंकणारेही महाशयही कमी नाहीत. मग मागच्या वाहन चालकाच्या अंगावर ती थुंकी उडाली तरी आम्हाला काही घेणंदेणं नाही.

एकीकडे देशात "स्वच्छ भारत अभियान' राबविलं जात असताना नागपुरात मात्र थुंकण्यावर काहीही परिणाम झालेला नाही. हा किळसवाना प्रकार थांबावा म्हणून आता नागपूर पोलिसांनीच दंड थोपटलंय. त्यासाठी खास पथकही तयार केलंय.

हे पथक शहरातील सार्वजनिक ठिकाणी फिरून थुंकणाऱ्यांवर थेट गुन्हेच दाखल करताहेत. आतापर्यंत 17 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आलाय. त्यामुळे थुंकबाज जरा घाबरून आहेत. थुंकताना दहावेळा विचार केला जातोय. ही कारवाई कायम सुरू राहावी तरच नागपूर खऱ्या अर्थानं स्मार्ट होईल.

PHOTOS : उदयनराजेंचा नादखुळा, शहरात चालवला कचऱ्याचा डंपर !

First published: August 25, 2018, 9:21 PM IST

ताज्या बातम्या