Home /News /maharashtra /

नागपूर : चोरट्यांनी 4 लाखांसह अख्ख एटीएम नेलं उखडून!

नागपूर : चोरट्यांनी 4 लाखांसह अख्ख एटीएम नेलं उखडून!

खडगाव येथील इंडिया 1 चे एटीएम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

    प्रशांत मोहिते, प्रतिनिधी नागपूर, 01 जानेवारी : नागपूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला  चोरट्यांनी एटीएम मशीन लंपास करून खळबळ उडवून दिली आहे. चोरट्यांनी चार लाखांपेक्षा अधिक रक्कमेसह एटीएम मशीन जीपमध्ये टाकून पसार झाले आहे. खडगाव येथील एटीएम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना  समोर आली आहे. या मशीनमध्ये अंदाजे चार लाखांहून अधिक रोकड होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडगाव मार्गावरील राजू खोब्रागडे यांच्या निवासस्थानी इंडिया वन कंपनीचे एटीएम लावले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दोन ते अडीच च्या दरम्यान चोरट्यांनी एटीएम उखडून नेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची जीप दिसून आली आहे. या जीमध्ये त्यांनी एटीएम नेल्याचं स्पष्ट झालं आहे. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. भाडेकरूंनी घरमालक खोब्रागडे यांना माहिती दिली. राजू खोब्रागडे घटनास्थळी पोहोचताच त्यांनी एटीएमचे संचालक आणि वाडी पोलिसांना घटनेबाबत कळवलं. वाडी पोलीस घटनास्थळी दाखल झालं. तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  पुढील तपास वाडीचे सहायक पोलीस निरीक्षक संकपाळ करीत आहेत. दरम्यान, हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एटीएम मशीनचे काही स्पेअर पार्ट आढळून आले आहे. या वस्तू चोरी गेलेल्या मशिनचाच भाग आहे आणि चोरट्यांनी त्या ठिकाणी टाकल्या असाव्यात, असा आमचा विश्वास आहे आता आम्ही पुढील तपास करून आरोपीला शोधून काढणार असल्याचं आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी दिलं. दरोडेखोराने 2 मिनिटांत बँकेतून 9 लाखांची रोकड पळवली तर दुसरीकडे दरोडेखोरानं हातात कोणतंही शस्त्र नसताना बँक लुटल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. दरोडेखोराने 2 मिनिटांत कोणालाही जखमी न करता, कोणताही गोंधळ न करता तब्बल 9 लाख रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे त्याच्याकडे कोणतंच हत्यार नसल्याचं सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर समोर आलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ही घटना घडली. याबद्दल पोलिसांनी सांगितले की, दुपारच्या वेळेत दरोडेखोर बँकेच्या शाखेमध्ये आला. त्यानंतर बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याने धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर बँकेतून 9 लाख रुपयांची रोकड घेऊन तो पळाला. बँकेवर दरोडा पडल्याची ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. यामध्ये दरोडेखोर रोकड पिशवीमध्ये भरताना दिसत आहे. त्याच्याकडे यावेळी कोणत्याही प्रकारचं शस्त्र  नव्हतं. त्याने फक्त आपल्याकडं शस्त्र असल्याचं भासवल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत आहे. दरोडेखोर दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी बँकेत आला आणि बँक लुटल्यानंतर तो 3 वाजून 4 मिनिटांत पळूनही गेला. दरोडेखोर बँकेत येण्याच्या एक मिनिट आधी वीज गेली होती. त्यानंतर वीज आली तेव्हा तो कॅश काउंटरवर पोहचला. अशा पद्धतीने त्याने हातात कोणतंही शस्त्र नसताना बँक लुटली. बँकेवर दरोडा पडला तेव्हा सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नव्हते. सध्या या प्रकऱणाचा तपास पोलीस करत आहेत. या दरोड्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा हात आहे का याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, बँक मॅनेंजरनी म्हटलं की, हे सगळं इतक्या कमी वेळात झालं की काहीच समजलं नाही.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: ATM, Nagpur crime, Nagpur news, Nagpur police

    पुढील बातम्या