Home /News /maharashtra /

जन्मदाता बापच झाला राक्षस, मुलीचे हाल बघून अस्वस्थ झालेल्या आईने उचललं कठोर पाऊल

जन्मदाता बापच झाला राक्षस, मुलीचे हाल बघून अस्वस्थ झालेल्या आईने उचललं कठोर पाऊल

एका 15 वर्षीय मुलीवर तिच्याच पित्याने बलात्कार केला आहे.

    प्रशांत मोहिते, नागपूर, 22 जानेवारी : नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. बाप लेकीचं एक अतूट नात समजलं जातं. या नात्याकडे कोणीही वाईट नजरेने बघत नाही. मात्र याच नात्याला काळीमा फासनारी घटना शनिवारी नागपूरमधील वाडीत घडली आहे. वाडी शहरातील एका 15 वर्षीय मुलीवर तिच्याच पित्याने बलात्कार केला आहे. हा प्रकार समोर आल्याने वाडी परीसरात हाहाकार माजला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मध्य प्रदेशवरून एक कूंटूब वाडीत मोलमजूरी करून पोट भरण्यासाठी आले होते. शनिवार दि.18 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान घरी सर्व झोपले होते. मुलीची आई बाहेरगावी कामानिमित्त गेली होती. घरी 1 भाऊ आणि 2 बहीण सर्व बाजूच्या खोलीत झोपले होते. मुलगी बाथरूमसाठी मध्यरात्री उठली. नराधाम बाप तिच्या मागे गेला. ती उठली आहे हे बघून बापाने तिच्यावर हात टाकला. याबाबत कोणाला सांगितले तर भाऊ आणि बहिणीला जिवे मारण्याची धमकीही क्रूर बापाने दिली. त्या भितीने पीडित मुलीने कोणाला काही सांगितले नाही. आई गावावरुन परतल्यानंतर पीडितेने आईला या कृत्याबाबत सांगितले. मुलीवर ओढवलेल्या या प्रसंगाने अस्वस्थ झालेल्या आईन तात्काळ पोलीस स्थानकाकडे धाव घेतली. फेसबुकवर पत्नी करायची VIDEO शेअर, फॉलोअर्स वाढले म्हणून चिडून पतीने केलं खल्लास आईच्या तक्रारीनंतर वाडी पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक देवीदास चोपडे,पीएसआय अविनाश जाईभाए पोहचले. त्यानतंर पोलिसांनी मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या नराधाम बापावर कलम 376, 2 (फ), 376 पोट कलम 3, सह कलम 4, 6,8, 10 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला. अटकेनंतर पोलिसांनी नराधम बापाला काल दि. 21 जानेवारी रोजी कोर्टात हजर केले. तसंच 7 दिवसांच्या कोठडीची पोलिसांनी मागणी केली. या घटनेची वाडी परिसरात दिवसभर चर्चा झाली. जन्मदात्या बापानेच मुलीवर बलात्कार केल्याच्या धक्कादायक घटनेनं परीसरात संतापाचे वातावरण आहे. तसेच कोणत्या नात्यावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या