VIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला

करण राजपुत नावाच्या या आरोपीने दुकानात घुसून मालक संतोष सरोज यांच्यावर चाकू हल्ला केला.

करण राजपुत नावाच्या या आरोपीने दुकानात घुसून मालक संतोष सरोज यांच्यावर चाकू हल्ला केला.

  • Share this:
    प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी नागपूर, 16 जानेवारी : शहरातील रामदासपेठ परिसरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या गुंड मुलाने पैसे न देता फुकट वस्तु नेण्याच्या कारणावरून दुकानदारावर चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या रामदासपेठ परिसरातील हॉटेल सेंटर पाईंट शेजारील सीपीसी पान सेंटर आहे. याच दुकानात करण राजपुत नावाच्या या आरोपीने दुकानात घुसून मालक संतोष सरोज यांच्यावर चाकू हल्ला केला. करण राजपुत हा कुख्यात गुंड आहे आणि त्याचे वडील कल्याणसिंग राजपुत हे नागपूर ग्रामीण पोलिसात डीवायएसपी होते आणि सीआयडीतही होते.  निवृत्तीनंतर ते सीबीआयमध्येही लिगल असिस्टंट म्हणून काम त्यांनी केलं होतं. करणवर दरोडा आणि लुटमारीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत. दरम्यान, करणने संतोषवर चाकुने हल्ला केला. तेव्हा प्रसंगावधान राखत त्यांनी हल्ला रोखला नाहीतर  जीवही गेला असता. नागपुरात पोलिसांचे राज्यस्तरीय खेळ सुरू आहेत आणि राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी सेंटर पाईंट हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्याच हॉटेलच्या परिसरात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ====================
    First published: