VIDEO : मैत्रीचा असा अंत! भरधाव वेगात चालवत होते बाईक, मेट्रोच्या खांबाला आदळून जिवलग मित्रांचा मृत्यू

VIDEO : मैत्रीचा असा अंत! भरधाव वेगात चालवत होते बाईक, मेट्रोच्या खांबाला आदळून जिवलग मित्रांचा मृत्यू

नागपुरात भरचौकात दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि एका क्षणात दोन जिवलग मित्रांचा जीव गेला.

  • Share this:

नागपूर, 13 फेब्रुवारी : वेगाने गाडी चालवणे, हेल्मेटचा वापर न करणे यामुळं रोज अपघात होत असतात. याला आळा घालण्यासाठी वाहतुकीचे नियमही कडक करण्यात आले. मात्र तरीही अपघाताची संख्या काही कमी झाली नाही. मंगळवारी नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यूवर एक विचित्र अपघात झाला. या अपघाताने दोन जिवलग मित्रांचा जीव घेतला.

नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यूवर येथे भावसार चौकात तीन मित्र एकाच गाडीवर जात होते. यातील चालकाने हेल्मेटही घातले नव्हते. अभिजीत जंगम आणि त्याचे दोन अन्य मित्र जुबैर आणि शिवम यांच्यासोबत ट्रिपल सिट पल्सरनं भरधाव वेगानं सेंट्रल एव्हेन्यूवरून जात होते. गांधी पुतळ्यापासून ते अग्रेसेन चौकाच्या दिशेने ते जात असताना भावसार चौकत वेगाने येत असलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने गाडीला धडक दिली. या भयंकर अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

वाचा-मोठा अपघात! भोपाळ रेल्वे स्टेशनच्या ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला, 9 जणं जखमी

वाचचा-काय डोकं आहे राव! तस्करीसाठी शेंगदाण्यात लपवल्या 45 लाखांच्या नोटा आणि...

वाचा-उमेदवारांवरच्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचा पक्षांना दणका

वाचा-अंतराळातून दर 16 दिवसांनी मिळतोय गूढ सिग्नल, रेडिओ लहरींनी संशोधकही चक्रावले

या विचित्र अपघाताच अभिजीत जंगम ( 21 वर्ष ) आणि मोहम्मद जुबैर (20 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातत अभिजीत आणि जुबैरचं डोकं मेट्रोच्या खांबाला आदळलं. यात या दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर शिवम व दुसरा बाईकस्वार गंभीर जखमी झाले आहेत. नेहमी एकत्र असलेल्या या तीन जिवलग मित्रांच्या मैत्रीचा अंत मृत्यूने झाला. पोलिसांनी अद्याप कोणावरही कारवाई केलेली नाही आहे.

First published: February 13, 2020, 12:24 PM IST

ताज्या बातम्या