नागपूर पोलिसांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतला! ट्विटरला असा दिला प्रतिसाद

नागपूर पोलिसांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतला! ट्विटरला असा दिला प्रतिसाद

नागपूर पोलिसांनीही मग लोकांना रस्ते वाहतुकीच्या नियमांची आठवण करून दिली.

  • Share this:

नागपूर, 12 डिसेंबर : सध्याचा काळ सोशल मीडियाचा काळ म्हणून ओळखला जातो. अनेकजण दिवसभरातील बहुतांश वेळ ट्विटर, फेसबुकवर अॅक्टिव्ह असतात. त्यातूनच मग ही माध्यमंही कधी-कधी आपल्या यूझर्सला सल्ला देत असतात. असाच काहीसा सल्ला ट्विटरने काल आपल्या यूझर्सला दिला. 'डोन्ट ड्रिंक अँड ट्वीट,' असं आवाहन ट्विटरने केलं होतं.

ट्विटरने केलेल्या या आवाहनावर लोक उलट-सुलट प्रतिक्रिया देत होते. त्यातच नागपूर पोलिसांनीही मग वाहत्या गंगेत हात धुवून घेत 'डोन्ट ड्राईव्ह अँड ट्वीट', असं आवाहन केलं. ट्विटरने आपल्या माध्यमावर कोणताही आक्षेपार्ह मजकूर येऊ नये म्हणून लोकांना आवाहन केलं असतानाच नागपूर पोलिसांनी मग लोकांना रस्ते वाहतुकीच्या नियमांची आठवण करून दिली.

दरम्यान, याआधीही पोलिसांनी हटके ट्वीट करत सोशल मीडिया यूझर्सचं लक्ष वेधून घेतलं होतं. मुंबई आणि नागपूर पोलिसांनी चित्रपटातील गाण्यांचा आधार घेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नियम समजावून दिले होते. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनीही लयभारी पोस्ट शेअर केली होती.

गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्यांना सावध कऱण्यासाठी एक व्यंगचित्र शेअर केलं. यामध्ये गाडीवरून जाणाऱ्याने फोन कानाला लावला आहे. त्याची रेंज टॉवरकडून थेट यमराजाकडे गेल्याचं दाखवण्यात आलं आहे. यात यमराज म्हणतो की, लक्षात ठेवा गाडी चालवत असताना तुमचा फोन मला सुद्धा लागू शकतो.

पुणे पोलीसही सतत वाहतूक नियमांबाबत जागृती करत असताना सोशल मीडियावर मिश्किल टिपण्णी करत असतात.

Published by: Akshay Shitole
First published: January 12, 2020, 1:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या