मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सहल जीवावर बेतली, 3 मित्रांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू, नागपूरमधील घटना

सहल जीवावर बेतली, 3 मित्रांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू, नागपूरमधील घटना

 सुट्टी असल्यामुळे सहल साजरी करायला कन्हान नदीवर हे तरुण आले होते. पोहता येत नसताना सुद्धा हे तरुण नदीपात्रात उतरले.

सुट्टी असल्यामुळे सहल साजरी करायला कन्हान नदीवर हे तरुण आले होते. पोहता येत नसताना सुद्धा हे तरुण नदीपात्रात उतरले.

सुट्टी असल्यामुळे सहल साजरी करायला कन्हान नदीवर हे तरुण आले होते. पोहता येत नसताना सुद्धा हे तरुण नदीपात्रात उतरले.

नागपूर, 27 नोव्हेंबर : पाण्याचा अंदाज येत नसेल पाण्यात उतरू नका अशी सूचना वारंवार केली जात असते. पण, बऱ्याच वेळा काही जण नको ते धाडस करतात आणि जीवाला मुकतात. अशीच एक घटना नागपूरमध्ये (nagpur) घडली आहे. सहलीसाठी आलेले 3 तरुण कन्हान नदीत (kanhan river nagpur) पोहोत असताना बुडाले. एकाचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुट्टी असल्यामुळे सहल साजरी करायला कन्हान नदीवर हे तरुण आले होते. पोहता येत नसताना सुद्धा हे तरुण नदीपात्रात उतरले होते त्याच दरम्यान ही घटना घडली.

स्वामी नारायण मंदिर ट्रस्टच्या वर्धमाननगर येथील शाळेतील शिक्षक व कर्मचारी आहे. मौदा तालुक्यातील वढना येथील स्वामींनारायन गोशाळेत सहलीसाठी आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास सर्वजण आले होते. त्यावेळी १० तरुण गोशाळेला परिसराला लागून असलेल्या कन्हान नदीच्या किनाऱ्यावर गेली होती.

परळी वैद्यनाथ मंदिर RDX ने उडवून देणाऱ्यांची निघाली हवा,पोलिसांनी 2 जणांना पकडले

काही वेळानंतर सर्व तरुण नदीत पोहण्याकरिता उतरले. परंतु, बुडालेले तीन तरुण खोल पाण्यात गेले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.  प्रशांत राजाभाई  पटेल (वय २३ वर्ष, नागपूर, मूळगाव तितलागड ओरिसा) या तरुणाचा मृतदेह मिळाला आहे. तर अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण (वय २१ ), हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया (वय २८) अशी दोन मृतांची नाव आहे.  हे दोघे जण अहमदाबाद, गुजरात येथील राहणारे होते. यातील एकाचा मृतदेह संध्याकाळी सापडला आहे तर दोघांचा शोध सुरू आहे.

Shocking! आजोबांसमोर आपले सर्व कपडे काढले; वृद्धाश्रमात घुसून महिलेचे अश्लील चाळ

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी श्याम मदुनरकर, तहसीलदार मलिक वीरानी, उपविभागीय पोलीस मुख्तार बागवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बेपत्ता तरुणाचा शोध सुरू करण्यात आला. पण रात्र झाल्यामुळे शोध अपूर्ण राहिला. उद्या सकाळी ndrf टीमला बोलावण्यात येणार असून बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात येईल, असं निरीक्षक हेमंत खराबे यांनी सांगितलं.

First published:

Tags: Nagpur News, नागपूर