प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर चाकूने केले वार

प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर चाकूने केले वार

नागपुरच्या लक्ष्मीनगरात प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रियकरानं प्रेयसीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

  • Share this:

नागपुर, 03 जुलै : नागपुरच्या लक्ष्मीनगरात प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रियकरानं प्रेयसीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही थरारक घटना शहरातील सर्वांत शांत समजल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौकाजवळ घडली आहे.

या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रोहित हेमनानी असं बावीस वर्षाच्या आरोपीचं नाव असून तो फरार सध्या आहे. युवतीवर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितची खामल्यात मोबाईल शॉपी आहे.

हेही वाचा : LIVE : अंधेरी रेल्वे रुळावर पुल कोसळल्याने 3 जण जखमी

शेतकऱ्याचा मुलगा म्हणून नवरी मिळेना,पैसे देऊन लग्न केलं पण...

गेल्या दोन वर्षांपासून या हल्ल्यात जखमी मुलीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध आहेत. मोनिका टेक्‍स्टाइल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात ती शिकते. गेल्या काही दिवसांपूर्वी मोनिका रोहितला टाळत होती. याचाच राग मनात धरून रोहितने या मोनिकावर हल्ला केला.

महिन्याभरापूर्वी दोघांचा वाद झाला. कडाक्‍याचे भांडण झाल्यानंतर त्यांचे 'ब्रेक अप' झालं. दुरावा निर्माण झाल्यामुळे रोहितचा फोन ती उचलत नव्हती. त्यामुळे तो चिडला होता. शेवटचे भेटायचे आहे, अशी गळ घातल्यामुळे मोनिकाने त्याला कार्यालयात बोलावलं होतं.

रोहितने मोठा चाकू पाठीमागे खोचून ठेवला होता. त्याने मोनिकाला कार्यालयाच्या बाहेर बोलावले. मात्र, तिने त्याला आत येण्यास सांगितलं. आत गेल्यानंतर लगेचच रोहितने मोनिकाच्या पोटावर, पाठीवर आणि मांडीवर चाकूचे सपासप वार केले. सुदैवाने ती यात बचावली आहे. पण रोहित मात्र फरार आहे.

हेही वाचा 

मिथुन चक्रवर्तींच्या मुलाविरूद्ध बलात्कार तर पत्नीविरूद्ध गर्भपाताचा गुन्हा दाखल

हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर

 लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

 

First published: July 3, 2018, 9:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading