नागपुर, 05 जुलै: नवी मुंबईतील सिडको घोटाळ्यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक झाले. विधानसभेत राधाकृष्ण पाटील आणि पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, विखेंनी तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. त्याचबरोबर आघाडी सरकारच्या काळात 200 एकर जमीन व्यवहाराचीही चौकशी केली जाणार आहे. यावेळी विखे, पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री, तिघांचीही डायलॉगबाजी आज पाहायला मिळाली.
हेही वाचा: हेमंत करकरे यांच्या मृत्युवर सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय
विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सिडको घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करणार असल्याची घोषणा केली. ‘जो शीशे के घर में रहते है, वो दुसरो के घर पे पत्थर नही फेकते’, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवसही आरोप- प्रत्यारोपाचाच होता. कोयना धरणग्रस्तांसाठी मंजूर केलेली 24 एकर जमीन सोयीस्कररित्या बिल्डरांकडे गेली असून, मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने राज्य सरकारचा 1,767 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसने सोमवारी केला होता. विरोधकांनी हाच मुद्दा गुरूवारही लावून धरत मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी केली होती.
हेही वाचा: नात्याला काळिमा, आई- बाबा नसताना भावानेच केला 8 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार
या आरोपाला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, भूखंडाची मालकी राज्य सरकारची असून जमिनीचा सिडकोशी संबंध नाही. या घोटाळ्यासाठी माझा राजीनामा मागितला जात असेल तर पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनाही राजीनामा द्यावा लागेला. आता चौकशी सुरू करुन ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे असे फडणवीस म्हणाले. पृथ्वीराज यांच्यासारख्या साध्या माणसाने कोणाच्याही सांगण्यावरुन असे आरोप करु नये असेही ते म्हणाले.
हेही वाचा: Buradi Case: धक्कादायक व्हिडिओ समोर, आत्महत्येची मिळून करत होते तयारी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.