'आॅरेंज सिटी'ची आॅरेंज रंगाची मेट्रो अखेर दसऱ्यापासून धावणार !
'आॅरेंज सिटी'ची आॅरेंज रंगाची मेट्रो अखेर दसऱ्यापासून धावणार !
एअरपोर्ट ते खापरी या 8 किलोमीटरच्या मार्गावरील ट्रायल पूर्ण झाल्याने ३० सप्टेंबरला दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचा शुभारंभ होणार आहे.
26 सप्टेंबर : मुंबईत नंतर अखेर नागपूर मेट्रो धावण्यासाठी सज्ज झाली आहे. एअरपोर्ट ते खापरी या 8 किलोमीटरच्या मार्गावरील ट्रायल पूर्ण झाल्याने ३० सप्टेंबरला दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचा शुभारंभ होणार आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी होऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला काम सुरू होऊन अडीच वर्षे झाले. या अडीच वर्षांत ४६ टक्के काम पूर्ण झाले असून २ हजार २०० कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले.
३८ किलोमीटरचा पूर्ण प्रकल्प पूर्ण व्हायला २०१९ हे वर्ष उजाडणार असला तरी एअरपोर्ट ते खापरी या मार्गावर मेट्रोने धावून यशस्वी टप्पा पूर्ण केला. कुठलीही चूक नको म्हणून बारीकसारीक सर्व तांत्रिक दोष दूर करण्यासाठी महामेट्रोची यंत्रणा कामाला लागली आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत संत्रा मेट्रोला ग्रीन सिंग्नल दिला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.