मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपला आणखी एक हादरा!

देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपला आणखी एक हादरा!

संदीप जोशी हे पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिले होते. पण, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी  संदीप जोशी यांचा पराभव केला होता.

संदीप जोशी हे पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिले होते. पण, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी संदीप जोशी यांचा पराभव केला होता.

संदीप जोशी हे पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिले होते. पण, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी संदीप जोशी यांचा पराभव केला होता.

नागपूर, 21 डिसेंबर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत (graduate and teacher legislative council election 2020)  भाजपला (BJP) सपाटून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्याचे परिणाम अजूनही भाजपमध्ये दिसून येत आहे. होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. महापौर संदीप जोशी (sandeep Joshi)आपल्या महापौरपदाचा राजीनामा देणार आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी आज महापौरपदाचा राजीनामा देणार आहे. संदीप जोशी हे  मनपा आयुक्तांकडे आपल्या महापौरपदाचा राजीनामा सोपवणार आहे. संदीप जोशी हे पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिले होते. पण, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी  संदीप जोशी यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा बालेकिल्ला होता. फक्त लढ म्हणा...! कॅन्सरवर मात करुन या कलाकारांनी केला दमदार कमबॅक पदवीधर निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर संदीप जोशी राजीनामा देत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, 13 महिन्यांच्या कार्यकाळ झाला आहे, त्यामुळे राजीनामा देत आहे, असल्याचं जोशी यांनी सांगितले आहे. याआधीही संदीप जोशी राजीनामा देतील अशी चर्चा रंगली होती. पण, त्यावेळी हे वृत्त फेटाळण्यात आले होते. विशेष म्हणजे, नागपूर पदवीधर निवडणुकीत  संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक अनिल सोले यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण, अनिल सोले यांचा पत्ता कट करण्यात आला आणि पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी यांना संधी देण्यात आली होती. अनिल सोले यांना उमेदवारी न दिल्यामुळे नितीन गडकरी गट नाराज असल्याची चर्चा रंगली होती. खुद्द संदीप जोशी यांनी अर्ज भरण्यापूर्वी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन गडकरी यांचा आशीर्वाद घेतला होता. पण, नागपूर भाजपमध्ये जोशी यांच्या उमेदवारीमुळे धुसफूस सुरूच होती. 'आपल्या काश्मिरी परिवाराला न सांगता मुंबई गाठली आणि...' हिना खान झाली भावुक अखेरीस पदवीधर निवडणुकीत संदीप जोशी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आपल्या होमग्राऊंडमध्ये पराभव झाल्यामुळे जोशी यांना चांगलेच जिव्हारी लागले. त्यामुळेच  जोशी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या