नागपूरच्या महापौरांचा 'प्रताप', स्वतःच्या मुलाला पीए दाखवून नेलं अमेरिकेच्या दौऱ्यावर

नागपूरच्या महापौरांचा 'प्रताप', स्वतःच्या मुलाला पीए दाखवून नेलं अमेरिकेच्या दौऱ्यावर

नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी नवा विक्रम केलाय. गेल्या 11 महिन्यात त्यांनी 11 परदेश दौरे करत नागपूरकरांच्या पैशावर स्वत:च्या मुलालाच त्यांनी एका दौऱ्यात सोबत नेलं.

  • Share this:

प्नविण मुधोळकर, नागपूर,ता. 16 सप्टेंबर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी नवा विक्रम केलाय. गेल्या 11 महिन्यात त्यांनी 11 परदेश दौरे केले आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यात तर त्यांनी आणखी कमाल केलीय. स्वतःचा मुलगा प्रियश याला पीए असल्याचं दाखवून त्यांनी त्याला अमेरिकेला नेलं. आता या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असून नागपूर शहर भाजपनेही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केलीय. तर महापौर नंदा जिचकार यांनी स्पष्टीकरण देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. माझा मुलगा हा माझं सोशल मीडिया अकाऊंट हाताळतो त्यामुळे मी त्याला सोबत नेलं अशी सारवासारव त्यांनी केलीय.

नागपूरच्या महापौर नंदा जिचकार या सध्या अमेरिकेतल्या सॅनफ्रान्सिस्को इथं पर्यावरण आणि ऊर्जे संदर्भातल्या जागतिक महापौर परिषदेला गेल्या आहेत. या दौऱ्यात त्यांनी आपला मुलगा प्रियश याला खाजगी सचिव म्हणून सोबत नेलं. अमेरिकन कॉन्सुलेटला व्हिसासाठी दिलेल्या पत्रात याचा उल्लेख असून ते पत्र न्यूज18 लोकमतच्या हाती लागलं आहे.

मनपाच्या कायद्यात महापौरांना खाजगी पीए देण्याची तरतूद नाही. त्यांना स्वतः खाजगी पीए ठेवता येतो. लोकांच्या पैशावर स्वत:च्या मुलाला परदेश वारी घडवणाऱ्या महापौरांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त होत असून महापौर परत आल्यावर त्यांना जाब विचारला जाईल असं भाजपचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी म्हटलं आहे.

 

VIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा

First published: September 16, 2018, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading