नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू, महापौर, आयुक्ताच्या बैठकीत मोठा निर्णय

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

  • Share this:
नागपूर, 16 डिसेंबर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे शहरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. येत्या शनिवार-रविवारी आणि पुढल्या आठवड्यात जनता कर्फ्यूचं नागरिकांना महापौर संदीप जोशी यांनी आवाहन केलं आहे. हेही वाचा...मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला अखेर मिळाली मजुंरी नागपूर महानगर पालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हा निर्णय जाहीर केला आहे. या दोन दिवसांच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. किराणा, भाजी आणि डेअरी तसंच जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील. शनिवार आणि रविवारची परिस्थिती बघून भविष्यातील इतर निर्णय घेण्यात येतील महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 8 दिवसांतच नागपुरात कोरोनाचे 13608 नवे रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे, 8 सप्टेंबरला एका दिवसात नागपूर जिल्ह्यात 2205 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर  37 रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे. कोरोना चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. ते मार्च महिन्याच्या तुलनेत 10 पटीन  तर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत दुपटीने वाढलं आहे. त्यामुळे वाढत्या चाचण्यांसह नागपुरात रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे तर्क मान्य केले तरी दर शंभर चाचण्यांमागे कोरोना बाधितांची संख्या वाढणे हे धोक्याची घंटा आहे. नागपूरात जम्बो हॉस्पिटलच्या मुद्यांवर राजकारण तापलं... मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भावाला सुरूवात झाली. परंतु या सहा महिन्यांच्या काळात प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचविल्याचे दिसून येते. 35 लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात मेयो, मेडिकलमधील 1200 खाटांचे कोविड हॉस्पिटल सोडल्यास प्रशासन दुसरे कोविड हॉस्पिटल उभे करू शकले नाही. 16 ऑगस्ट रोजी पालकमंत्री नितीन राऊत यांनी अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असे हजार खाटांचे ‘जम्बो कोविड रुग्णालय’ मानकापूर येथे उभारण्याची घोषणा केली असली तरी ते देखील आता जम्बो हॉस्पिटल उभारण्या साठी 2 महिने लागतील अशी माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. हेही वाचा...संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्त्व करावं, शिवसेना खासदाराचं साकडं परंतु दोन महिने जम्बो हॉस्पिटलला लागतील तर सर्व सामान्य लोकांचे काय जे कोरोना ग्रस्त आहेत. अशात पालकमंत्री यांच्या निर्णयावर महापौर संदीप जोशी यांनी सवाल उभा केला आहे,. नागपूरच्या परिस्थितीवर केवळ घोषणाबाजी सुरू असल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.
Published by:Manoj Khandekar
First published: