मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

देवेंद्र फडणवीसांना नोटीस, सरकारी कर्मचाऱ्यांचे खाते वळवले Axis बँकेत

देवेंद्र फडणवीसांना नोटीस, सरकारी कर्मचाऱ्यांचे खाते वळवले Axis बँकेत

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

नागपूर,5 मार्च:माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे. पदाचा गैरवापर करून सरकारी कर्मचाऱ्यांचे खाते अॅक्सिस (Axis) बँकेत वळवल्याचा आरोप फडणवीसांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने फडणवीस यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिवांनाही नोटीस बजावली आहे. पुढील आठ आठवड्यात कोर्टात उत्तर सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा.. येस बँकेच्या खातेधारकांवर कोसळली कुऱ्हाड, फक्त 50 हजार काढण्याची मुभा

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी परिपत्रक काढून सरकारी कर्मचाऱ्यांची एसबीआय व इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधील खाती अॅक्सिस बँकेत वळती करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप करणारी जनहित याचिका मोहनीश जबलापुरे यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.

हेही वाचा..विवस्त्र करून मारहाणीचा VIDEO केल्याच्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी केला धक्कादायक दावा

काय आहे प्रकरण?

राज्य सरकारने 11 मे 2017 रोजी एक परिपत्रक काढले होते. राज्यातील पोलिसांची बँक खाती तसेच संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेमध्ये उघडण्यास सांगितले. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अॅक्सिस बँकेला मुद्दाम झुकते माप दिले होते. मुख्य म्हणजे या निर्णयाचा आर्थिक फटका राष्ट्रीय बँकांना बसल्याचा दावा, याचिकेकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी केला आहे. त्यामुळे यासंदर्भात फडणवीस यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी, जबलापुरे यांनी केली आहे. याप्रकरणी कोर्टाने गुरुवारी मोहनीश जबलापुरे यांची बाजू ऐकून घेत कोर्टाने फडणवीस यांच्यासह अन्य तीन प्रतिवादींना नोटीस बजावत आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

First published:

Tags: Cm devendra fadadnvis, Devendra Fadanvis, Maharashtra politics