मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाग'पूर'मय,अतिवृष्टीत चौघांचा मृत्यू

नाग'पूर'मय,अतिवृष्टीत चौघांचा मृत्यू


उपराजधानीत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. आणि विधिमंडळाचं बघता बघता तळं झालं.

उपराजधानीत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. आणि विधिमंडळाचं बघता बघता तळं झालं.

उपराजधानीत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. आणि विधिमंडळाचं बघता बघता तळं झालं.

नागपूर, 06 जुलै : नागपूर जिल्ह्यात पावसाने तुफान धुमाशान घातले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालाय. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत चौघांचा मृत्यू झालाय. मानेवाडा मंगलदीप नगरात 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह नाल्यात सापडला. निलेश चावके असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तर एका अनोळखी व्यक्तीचा कापसी महालगाव मध्ये मृतदेह सापडला.

VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

तर रामटेक पिंडकेपार गावात विज पडून दोन मुले दगावली. हर्षल काशिनाथ चनेकर (वय १७) आणि नागेश्वर हंसाराम मोहुर्ले (वय १८) अशी मृतांची नावे आहे. दोघेही शेतात जात असतांनी अचानक वीज पडून मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे हे दोघेही याच वर्षी बारावी परीक्षा पास झाले होते.

मनपाच्या अग्निशमन विभागाने तर 750 लोकांना वाचवले

शहरात 168 पाणी भरल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्यात. मनपाच्या अग्निशमन विभागाने तर 750 लोकांना वाचवले. नागपूर महानगर पालिकेची माहिती....

 

1) हुडकेश्वर – आदर्श संस्कार विद्यालयातून 450 विद्यार्थ्यांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. एसडीआरएफच्या जवानांनी केले मदतकार्य.  

2) हुडकेश्वर – आदर्श संस्कार विद्यालयाच्या वसतीगृहातून 150 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.

3) हुडकेश्वर – 24 लोकांना साईनगर भागातून बोटीतून घराबाहेर काढण्यात आले.

4) हुडकेश्वर परिसरातील भारत पेट्रोल पंपासमोर 80 लोकांना बोटीने वाचविण्यात आले.

5) खापरी नाका येथे वृद्ध महिलेला दोराच्या साहाय्याने वाचविण्यात आले.

6) हुडकेश्वर खुर्द येथे 9 लोकांना दोराच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले

7) हुडकेश्वर खुर्द मधील अड्याळ खुर्द गावात चार जणांना दोराच्या सहायाने  वाचविण्य़ात आले,

8) समाधान ले आऊट साकेत नगर बेलतरोडी रोड येथे दोराच्या साहायाने चार जणांना वाचविण्यात आले.

9) विहिरिगाव येथील कळमना गावात एकाच परिवारातील पाच जणांना वाचविण्यात आले.  

10) कळमण्यातीलच उमरगाव मध्ये पाच नागरिक आणि पाच बकऱ्यांना वाचविण्यात आले

11) उमरेड रोडे हेरिटेज बिल्डिंग मधून 3 लोकांना वाचवले.

विधानभवन पाण्यात !

दरम्यान,  पावसाचा जरासा जोर वाढला की तुम्ही आम्ही गुडघाभर पाण्यातून चालतो. आपल्या परिसरातली बत्ती गुल होते. तुम्हा-आम्हाला सोसाव्या लागणाऱ्या या समस्या आज आपल्या राजकीय कैवाऱ्यांना भोगाव्या लागल्या.

चंद्रशेखर बावनकुळे पाण्यातून चालतात आणि विखे पाटील बावनकुळेंची गंमत पाहताहेत, दारूच्या बॉटल्स सापडल्या आहेत, हरिभाऊ बागडे दूरवरून सगळं पाहताहेत...

ही दृश्य पाहिल्यानंतर उभ्या महाराष्ट्रानं नागपुरात कोसळलेल्या पावसाचे नक्कीच धन्यवाद मानले असतील.

कारण काही तासांसाठी का होईना, या पावसामुळे स्वतःला महाराष्ट्राचे राजकीय कैवारी मानणाऱ्यांना सर्वसामान्यांच्या समस्या भोगाव्या लागल्या.

उपराजधानीत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. आणि विधिमंडळाचं बघता बघता तळं झालं.

पावसाळ्यात 'या' ठिकाणांवर आहे पर्यटनासाठी बंदी

उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची पाण्यातून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागली  आणि त्यांची ही कसरत टीपण्याची संधी फोटोग्राफरनं सोडली नाही.

तिकडे पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून विरोधी पक्षाचे नेते ही सगळी गंमत पाहत होते.

तिकडे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते एका छोटेखानी लॉनवर अडकले होते.

विधानभवनाचं तळघर पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं वीजपुरवठा बंद करावा लागला.

सगळ्या मंत्र्यांच्या कक्षात अंधार पसरला. एकनाथ खडसेंच्या कक्षात मेणबत्ती मिणमिणतेय समजल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी त्या दालनाचा आसरा घेतला.

मात्र मंत्र्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय हे दाखवण्यासाठी तेवढासा प्रकाश पुरेसा होता.

पाण्याचा निचरा करण्यासाठी जेव्हा सफाई कर्मचारी विधानभवन परिसरातल्या नाल्यात उतरले तेव्हा त्यांच्या हाती लागलेली गोष्ट पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.कारण नाल्यातून चक्क दारूच्या बाटल्या आढळून आल्या. आता हा कोणत्या तळीरामाचा प्रताप असा सवाल विरोधक विचारताहेत.

दुपारपर्यंत पावसाचा जोर ओसरत नाही तोच या मुद्द्यावरून विरोधकांनी बरसायला सुरूवात केली.

सरकारी यंत्रणांच्या बेपर्वाईमुळं सर्वसामान्य माणूस रोज गुडघाभऱ पाण्यातून चालतो. खड्यातून प्रवास करताना स्वतःची हाडं खिळखिळी करून घेतो. राज्यातली कित्येक खेडी लोडशेडिंगमुळं अंधारात चाचपडत जगताहेत. मात्र पावसानं आज नेत्यांना सर्वसामान्यांचं जगणं जगायला भाग पाडलं...वरूणराजा...तुझे मानावे तेवढे उपकार कमी आहेत.

First published:

Tags: Nagpur, Nagpur flood, Nagpur rain, अतिवृष्टी, नागपूर, पावसाळी अधिवेशन