नागपूर : धावत्या रेल्वेचे चाक तुटले, महिला प्रवाशी जखमी

नागपूर : धावत्या रेल्वेचे चाक तुटले, महिला प्रवाशी जखमी

रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानाला वेळीच रेल्वेचं चाक तुटल्याचं लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला

  • Share this:

नागपूर, 29 मे : जिल्ह्यातील काटोलजवळ एका रेल्वेचे चाक तुटल्याची धक्कादायक घटना घडलीये. या दुर्घटनेत एक महिला जखमी झालीये.

उत्तरप्रदेशातील गोरखपुरहून बंगलोरच्या यशवंतपुरला ही  एक्स्पेस जात होती. अचानक सोनखांब जवळ गाडीचं एक चाक तुटले होतं. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानाला वेळीच रेल्वेचं चाक तुटल्याचं लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. रेल्वे गाडीचे चाक तुटल्याने एक महिला प्रवाशी जखमी झाली आहे.

सकाळी आठपासून ही रेल्वे सोनखांब स्टेशन जवळच उभी करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान चाक तुटलेल्या कोचला वेगळे करून रेल्वे पुढे रवाना करण्यात येणार आहे.

First published: May 29, 2018, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading