मामाच्या मित्रांनीच पाजली बिअर.. नागपुरात 18 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

मामाच्या मित्रांनीच पाजली बिअर.. नागपुरात 18 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात 18 वर्षांच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीने बिअर पाजून तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

हर्षल महाजन, (प्रतिनिधी)

नागपूर, 1 ऑगस्ट- महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात 18 वर्षांच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीने बिअर पाजून तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेल तरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. निखिल सोमकुवर (25), वतन गोमकाले (25) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी हे पीडितेच्या मामाचे मित्र असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. आईने विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर पीडितेने आपबिती सांगितली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता बी.कॉम प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. निखिल सोमकुंवर हा मुख्य सूत्रधार आहे. तो पीडितेच्या मामाचा मित्र आहे. निखिल आधी मुंबईत काम करत होता. काही दिवसांपूर्वीच तो नागपुरात आला असून तो एका खासगी कंपनीत मॅनेजर आहे. तिने तीन महिन्यांपूर्वी पीडितेसोबत 'फेसबुक'च्या माध्यमातून फ्रेंडशिप झाली होती. 17 जुलैला आरोपी निखिल पीडितेच्या घर आला होता. तेव्हा पीडितेची आई कामाला गेली होती. भाऊ शाळेत गेला होता. निखिलने पीडितेचा हात पकडून तिला बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घाबलेल्या पीडितेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे निखिलला अधिक बळ मिळाले.

(हेही वाचा.. 'त्या' घटनेला वेगळं वळण.. मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या तरुणीवर गॅंगरेप)

पीडितेच्या जबाबानुसार, 19 जुलैला दुपारी दीड वाजता निखिल आणि त्याचा वतन गोमकाले पुन्हा पीडितेच्या घरी आले. त्यांनी सोबत बिअरची बाटलीही आणली होती. दोघांनी पीडितेला जबरदस्तीने बियर पाजली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. एवढेच नाही तर या बाबत कुठे वाच्यता केल्याच तुझ्या भावाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन दोघे फरार झाले. आई घरी आल्यानंतर मुलीच्या वर्तवणुकीबाबत तिला शंका आली. तिने विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर पीडितेने आपबिती सांगितली. बुधवारी (31 जुलै) बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

(हेही वाचा...पुण्यात डॉक्टर महिलेला केले ब्लॅकमेल.. लॉजवर बलात्कार करून बनवला अश्लील व्हिडीओ)

'पतली कमर'वर महिला पोलिसांचा TIKTOK व्हिडिओ व्हायरल

Published by: Sandip Parolekar
First published: August 1, 2019, 2:48 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading