लढत विधानसभेची : नागपूर पूर्व मध्ये यंदा कोण बाजी मारणार?

लढत विधानसभेची : नागपूर पूर्व मध्ये यंदा कोण बाजी मारणार?

गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व मोडीत काढून आपला प्रभाव निर्माण केला आहे. भाजपच्या या मुसंडीमुळे काँग्रेस पक्षाला नागपूर पूर्व मतदारसंघात आव्हानं निर्माण झाली आहेत.

  • Share this:

नागपूर, 18 सप्टेंबर : नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन्ही दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आहे.याच मतदारसंघात भाजपच्या 'स्मार्ट सिटी' योजनेची अमलबजावणी करण्यात आली आहे.

गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व मोडीत काढून आपला प्रभाव निर्माण केला आहे. भाजपच्या या मुसंडीमुळे सध्या तरी काँग्रेस पक्षाला नागपूर पूर्व मतदारसंघात आव्हानं निर्माण झाली आहेत.

2004 पर्यंत एकूण 9 विधानसभा निवडणुकांमध्ये नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विजय मिळवला होता. 1990 पासून 2004 पर्यंत या मतदारसंघातून काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी विजयी झाले होते.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कृष्णा खोपडेंना उमेदवारी दिली आणि इथे भाजपचा विजय झाला. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला आणि काँग्रेसची विजयी मालिका खंडित झाली.

उमेदवारी कुणाला ?

2014 च्या विधानसभा निवडणुकीतही कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांचा पराभव केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीत कृष्णा खोपडे यांचंच नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. पण यावेळी बाल्या बोरकर, चेतना टांक, बंटी कुकडे हेही उमेदवार भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत.

महाराष्ट्राचा महासंग्राम : परळीमध्ये भावा-बहिणीच्या लढतीकडे राज्याचं लक्ष

काँग्रेसमध्येही अनेक जण उमेदवारीसाठी रांगेत आहेत. अभिजीत वंजारी यांच्यासोबतच राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेले अतुल लोंढे यांचीही इथून लढण्याची इच्छा आहे.आघाडी आणि युती झाली नाही तर आणखी उमेदवार तयारी करत आहेत. राष्ट्रवादीचे दूनेश्वर पेठे हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर शिवसेनेकडून प्रकाश जाधव यांचं नाव आघाडीवर आहे.

भाजपने यावेळी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात 1 लाखांच्या मताधिक्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे काँग्रेस भाजपला या मतदारसंघात कितपत आव्हान देऊ शकतं, हे पाहावं लागेल.

लोकसभा निवडणूक 2019 (नागपूर पूर्व मतदारसंघात पक्ष निहाय मतदान)

नितीन गडकरी (भाजप) - 1 लाख 35 हजार 451 मत

नाना पटोले (काँग्रेस) - 60 हजार 71 मत

नागपूर पूर्व विधानसभा निवडणूक निकाल 2014

कृष्णा खोपडे, भाजप - 99 हजार 136

अभिजित वंजारी, काँग्रेस - 50 हजार 522

==========================================================================================

SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

Published by: Arti Kulkarni
First published: September 18, 2019, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading