नागपूर पुन्हा हादरलं; 3 दिवस होते घर बंद, दार उघडल्यानंतर आढळला मामा-भाचीची मृतदेह

नागपूर पुन्हा हादरलं; 3 दिवस होते घर बंद, दार उघडल्यानंतर आढळला मामा-भाचीची मृतदेह

मंजुषा नाटेकर या भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या

  • Share this:

नागपूर, 05 फेब्रुवारी : नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहे. आज दुहेरी हत्याकांडामुळे नागपूर शहर हादरलं आहे. शहरातील सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तात्रय नगरमध्ये मामा आणि भाचीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मंजुषा जयंतराव नाटेकर  (वय-55)  आणि अशोक काटे (वय 70 मामा) अशी मृतांची नावं आहे. गेल्या काही दिवसांपासून नात्याने मामा असलेले अशोक काटे हे मृत  मंजुषा यांच्याकडे राहायला आले होते.

मंजुषा नाटेकर या भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्यांना एक मुलगा आहे. तो पुण्याला राहतो. मंजुषा नाटेकर यांचं घर गेल्या 3 दिवसांपासून बाहेरून बंद होतं. शनिवारी त्या शाळेत गेल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्याने घरीच होत्या. त्यानंतर सोमवारपासून त्या घराबाहेर आल्याचं नसल्याचं शेजाऱ्यांच्या लक्ष्यात आलं. आज तिसऱ्या दिवशी घरातून दुर्गंधी यायला लागली. त्यामुळे घर उघडले असता दुहेरी हत्याकांड झाल्याचं समोर आलं.

घर उघडून आत गेल्यानंतर मंजुषा आणि अशोक काटे यांचा मृतदेह आढळून आला. शेजाऱ्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती कळावली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मामा अशोक काटे यांची गळा घोटून  तर मनीषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर  मृतक मंजुषा यांचे पती जयंतराव नाटेकर हे दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे संशयाची सुई ही पती जयंत नाटेकर यांच्यावर जात असल्याचं प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे.

वडिलांना नाही बघवलं लेकीचं प्रेम, मुलासोबत कट रचून प्रियकराची केली निर्घृण हत्या

दरम्यान, शहापूरमध्ये  प्रेम प्रकरणातून प्रियकराची हत्या झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. गेल्या 2 वर्षांपासून तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. पण मुलीच्या घराच्यांना हे मान्य नसल्याने तिच्या वडिलांनी आणि भावाने कट रचत लेकीच्या प्रेमाची निर्घृण हत्या केली आहे.

निलेश हंबीर नावाच्या तरुणाचं गांडुळगावातील एका तरुणीशी गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या प्रेमाला तरुणीच्या घरातून नकार होता. त्यामुळे त्यांनी लेकीच्या प्रियकराची निर्दयीपणे हत्या केली. यामध्ये पोलिसांनी आरोपी पिता आणि भावाला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

निलेश हंबीर आणि तरुणीच्या प्रेम प्रकरणावरून यापूर्वी घरात वाद झाल्याचं तपासात समोर आलं आहे. दोघांच्या प्रेमावरून दोन्ही घरात मोठा वाद झाला होता. त्या अनुषंगाने किन्हवली पोलीस ठाण्यात दोन्ही नातेवाईकांविरोधात कारवाईदेखील करण्यात आली होती. पण तरी दोघांचं रिलेशन सुरू असल्याचं लक्षात येता तरुणीच्या वडिलांकडून हे कृत्य करण्यात आलं.

सोमवारी दुपारच्या सुमारास वासिंद इथल्या महाविद्यालयातून परीक्षा देऊन तरुण डोळखांब इथे आली. तिथे निलेश, त्याचा भाऊ दशरथ हंबीर आणि तरुणी एका बाईकवरून गांडुळवाड इथे घरी जाण्यासाठी निघाले. अर्ध्या वाटेमध्ये वाघदरा जंगलाच्या इथे तरुणीचे आरोपी पिता आणि भाऊ प्रियकराला मारण्यासाठी डबा धरून बसले होते.

निलेशची बाईक दिसताच त्यांनी रस्त्यात गाडी अडवली आणि त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये निलेश गंभीर जखमी झाला होता. अखेर उपाचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

First published: February 5, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading