नागपुरात मायलेकीचा मृतदेह आढळला, व्यक्त केला जातोय वेगळाच संशय

नागपुरात मायलेकीचा मृतदेह आढळला, व्यक्त केला जातोय वेगळाच संशय

अंबाझरी तलावात आई आणि मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Share this:

नागपूर, 16 ऑक्टोबर: अंबाझरी तलावात आई आणि मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. दोन्ही मायलेकींनी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सविता खंगार (वय- 45) आणि रुचिता खंगार (वय-20) मृत मायलेकीची नावं आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोटले असून कौटुंबिक कलहातून मायलेकीनं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा...जळगाव हादरलं, एकाच घरात आढळले अल्पवयीन बहीण भावासह 4 जणांचे मृतदेह

सविता खंगार यांची थोरली मुलगी शीतल खंगार हिनं सांगितलं की, मध्यरात्रीच्या सुमारास तिची आई आणि धाकट्या बहिणीनं वाथोडा येथील विद्यानगरातील निवासस्थान सोडलं. ते तलावाच्या दिशेनं जात होते. शीतल हिनं त्यांचा पाठलाग केला. शीतलनं आई आणि बहिणीला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्या दोन्ही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. काही समजण्याच्या आत सविता आणि रुचिता या मायलेकीनं तलावात उडी घेतली.

शीतलनं याबाबत अंबाझरी पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. सविता आणि रुचिताचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी अंबाझरी पोलिस स्टेशनमध्य आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दुसरीकडे, ऑनलाईन व्यवसायात नुकसान झाल्यामुळे एका उच्चशिक्षित महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रियांका मंगेश राऊत (वय-32, तुकोबा, बिडीपेठ) असं मृत महिलेचं नाव आहे. प्रियांका विदेशात ऑनलाईन बिझनेस करत होत्या. त्यात त्यांना नुकसान झाल्याचं समजतं. त्याच नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, प्रियांका आपल्या पतीसोबत फिरायला गेल्या होत्या. रात्री सगळ्यांनी सोबत जेवण केलं. रात्री 12 वाजता त्या लॅपटॉपवर काम करत होत्या. पती आणि मुलगी दुसऱ्या बेडरुममध्ये झोपले होते. मात्र, रात्री तीनच्या सुमारास मुलगी रडायला लागली म्हणून मंगेश यांना जाग आली. ते मुलीला घेऊन पत्नी प्रियांकाच्या रुमकडे केले. मात्र, प्रियांका गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

हेही वाचा...सावधान! ऑनलाइन शॉपिंग करताना नकली सामान देऊन होतेय फसवणूक, वाचा अशावेळी काय कराल

मुलीसाठी बांधलेल्या पाळण्याच्या दोरीनं प्रियांका यांनी गळफाल घेतला. प्रियांका यांनी कामाच्या ताणामुळे आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलीस स्टेशनमध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 16, 2020, 12:22 PM IST

ताज्या बातम्या