नागपुरात धोका वाढला, 12 तासांत 14 रुग्ण; मरकजहून परतलेल्यांना कोरोनाची लागण

नागपुरात धोका वाढला, 12 तासांत 14 रुग्ण; मरकजहून परतलेल्यांना कोरोनाची लागण

नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 41वर पोहोचली आहे. प्रशासन आणि नागपूरकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

  • Share this:

नागपूर, 12 एप्रिल : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. नागपुरात 12 तासांत तब्बल 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे 14 जण दिल्लीतील मरकजहून परतले होते. त्यांना नागपूरच्या आमदार निवास येथे क्वारंटाईन करण्यात आलं होतं. रविवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यातील 9 नागपूर शहरातील, 1 नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील तर 4 मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

नागपुरात आता कोरोना बधितांचा आकडा 41 वर गेला आहे. 8 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, एकाच दिवशी 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. यावर खबरदारी म्हणून नागपूर पालिकेकडून रुग्ण सापडलेला परिसर सील करण्यात आला असून, या रुग्णांच्या संपर्कात कोणी आलं होतं का याचा तपास सध्या सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे.

ZOOM वर ऑनलाईन क्लासेस सुरू असतानाच दिसले अश्लील फोटो, सरकारने अॅपवर घातली बंदी

महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने घातलेला विळखा वाढतच चालला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 1895 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

कोरोनाचं व्हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत 113 रुग्ण आढळले आहे. वरळी, कोळीवाडा, धारावी आणि उपनगरात नवे रुग्ण आढळले आहे. वसई आणि विरारनंतर आता मीरा भाईंदरमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. आज सकाळपर्यंत मीरा भाईंदरमध्ये 7 नवे रुग्ण आढळले आहे. तर पुण्यात 4 रुग्ण आढळून आले. नवी मुंबई, ठाणे महापालिका, वसई विरार इथं प्रतेकी 2 रूग्णांची वाढ झाली आहे. तर रायगड, अमरावती, भिवंडीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

आयसोलेशनमध्ये गर्भवती महिलेवर दोन दिवस केला बलात्कार, आईसोबत बाळाचाही मृत्यू

भारतात रुग्णांची संख्या 8,356 वर

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात 24 तासांत 909 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर अद्यापही 2 हजार नागरिकांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 24 तासांत कोरोनामुळे 34 तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात रुग्णांची संख्या 8,356 वर पोहोचली आहे. त्यापैकी 7,367 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 716 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामध्ये सर्वात लहान 6 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.

आजीला फरशीने ठेचून रचला आकस्मिक मृत्यूचा बनाव, नातवासह चौघांना अटक

First published: April 12, 2020, 3:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading