मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Crime कॅपिटल झालेल्या नागपूरमधील चाईल्ड पोर्नोग्राफीचं धक्कादायक वास्तव समोर

Crime कॅपिटल झालेल्या नागपूरमधील चाईल्ड पोर्नोग्राफीचं धक्कादायक वास्तव समोर

नागपुरातून चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून व्हायरल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  Akshay Shitole
प्रशांत मोहिते, नागपूर, 16 फेब्रुवारी : संपूर्ण देशभरात चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी असताना नागपुरातून चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून व्हायरल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणेशपेठ, जरीपटका, नंदनवन आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बीभत्स व्हिडिओ अपलोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 'नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एम्प्लॉईटेड चिल्ड्रन' आणि 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो' या दोन संघटना देशभरात होणाऱ्या अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर नजर ठेऊन असतात. नागपुरातून चाईल्ड पोर्नोग्राफी सोशल मीडियावर अपलोड केल्याचं या संघटनेच्या निदर्शनास आलं. त्यानंतर ही माहिती गुन्हे शाखेला देण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखेने पॉस्को आणि सायबर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींचा शोध पोलीस घेत असून अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उललली जात असल्याची महिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी दिली. पुण्यातही समोर आला होता चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रकार सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातही असा प्रकार समोर आला होता. पुण्यात चाईल्ड पार्नोग्राफीचे 100 ते 150 व्हिडिओ अपलोड झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पुण्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ही माहिती उघड केली. दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. राजकुमार पुट्टीलाल आणि मनोजकुमार सरोज या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली.
First published:

पुढील बातम्या