हेल्मेट असतं तर वाचला असता, नागपुरातील अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO

हेल्मेट असतं तर वाचला असता, नागपुरातील अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO

हेल्मेट न घालण्याचा हा अट्टाहास एका युवकाच्या जीवावर बेतला आहे. नेमकं काय घडलं पाहा CCTV VIDEO

  • Share this:

नागपूर, 17 जानेवारी: वाढते अपघात लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्तीचं केलेलं असतानाही हा नियम अद्यापही अनेक ठिकाणी पाळला जात नाही. काही ठिकाणी तो न पाळण्य़ाचा अट्टाहास केला जातो. हेल्मेट न घालण्याचा हा अट्टाहास एका युवकाच्या जीवावर बेतला आहे. वारंवार वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट घाण्याचं आवाहन करूनही हेल्मेट न घालता सुसाट दुचाकी चालवली जाते. असाच प्रकार घडला नागपुरात.

नागपुरातील राम कुलर चौकात विना हेल्मेट घातलेला तरुण सुसाट वेगानं दुचाकी चालवत होता. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून जात भरधाव वेगानं जाणाऱ्या या युवकाचा भीषण अपघात झाला आहे. दोन दुचाकींची धडक झाली आणि हा युवक दोन फूट लांब फेकला गेला. यावेळी त्याच्या डोक्यावर हेल्मेट नसल्यानं डोक्याला मार बसला या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रचित मदने असं या युवकाचं नाव आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हेही वाचा-हरणांचा पाहुणचार करणं महिलेला पडलं महागात, भरावा लागला 39 हजारांचा दंड

रचित मदने गांधी गेटकडून अशोक चौकाच्या दिशेने रविवारी सकाळी वेगाने जात असताना राम कुलर चौकात एक दुचाकी अडवी आली आणि त्यामुळे वेगात असलेल्या सचितला बाईकवरचं नियंत्रण आवरणं कठीण झालं आणि तिथे धडक झाली. बाईकस्वार रचित थेट बाईकवरून दोन फूट लांब फेकले गेले आणि डिव्हायडरवर आदळले त्यांचा डोक्याला मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की युवकानं हेल्मेट घातलं नव्हतं. हेल्मेट असतं तर युवकाचा जीव वाचला असता. अशा घटना टाळण्यासाठी वारंवार वाहतूक पोलिसांकडून युवकांना हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं जातं. वाहतुकीचे नियम अधिक कठोर केले आहेत. मात्र तरीही अनेक तरुण बेपरवाई करत नियम धाब्यावर बसवतात आणि अशा घटनांना समोरं जावं लागतं.

हेही वाचा-VIDEO : ट्रकमधून फिरताना हत्तीला दिसला ऊस अन् रस्त्यातच घेतला लंच ब्रेक

First published: February 17, 2020, 11:22 AM IST

ताज्या बातम्या