नागपूर 29 मे : नागपूरच्या बुटीबोरी इथल्या मोरारजी कंपनीतल्या 20 कामगारांना बुधवारी विषबाधा झाली. या कामगारांच्या जेवणात पाल आढळल्याने त्यातून विषबाधा झाल्याचं स्पष्ट झालं. या कॅन्टीनमध्ये निकृष्ट पद्धतीचं जेवण मिळत असल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली होती मात्र त्याची दखल घेतली असल्याची बाबही पुढे आलीय.
दुपारी काम संपल्यानंतर हे सर्व कामगार जेवायला कॅन्टीनमध्ये आले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी तिथले जेवण घेतले. नंतर एका डब्यात पाल आढळून आल्याने सगळ्यांनाच धकाक बसला. नंतर काही वेळातही कामगारांना त्रास व्हायला सुरुवात झाली.
मळमळ करणं, उलट्या, डोकेदुखी असा त्रास व्हायला लागला. त्यामुळे तातडीने या सगळ्या कामगारांना बुटीबोरीच्या रचना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तिथे उपचार उपचार सुरू आहेत. या कॅन्टीनच्या मालकावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी कामगारांनी केलीय.
कॅन्टीमध्ये अतिशय निष्काळीपणे जेवण तयार केलं जातं. स्वच्छतेची कुठलीही काळजी घेतली जात नाही अशी तक्रार वारंवार करण्यात येत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच ही घटना घडल्याचं इथल्या कामगारांनी स्पष्ट केलं. हा निष्काळीपणा करणाऱ्या कॅन्टीन चालकावर तातडीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.