नागपूरमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त रोहिंग्या, भाजपचा घणाघाती आरोप

नागपूरमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त रोहिंग्या, भाजपचा घणाघाती आरोप

'महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अवैधरीत्या बांगलादेशी तसेच रोहिंग्या राहत आहेत. त्यांची पोलिसांनादेखील सखोल माहिती आहे.'

  • Share this:

नागपूर, 18 फेब्रुवारी : 'उपराजधानी नागपूरसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अवैधरीत्या बांगलादेशी तसेच रोहिंग्या राहत आहेत. त्यांची पोलिसांनादेखील सखोल माहिती आहे. नागपुरात तर 50 हजारांहून अधिक रोहिंग्या राहतात. यातील काही तत्त्वांच्या माध्यमातून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत,' असा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी केला आहे.

भाजप आमदार गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषद घेत सीएएबाबत भाष्य केलं आहे. 'देशात 'सीएए' कायदा लागू झाला असून तो देशातील अल्पसंख्यांकांविरोधात नाही. इतर देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकता देणारा हा कायदा आहे. परंतु 'सीएए' आणि 'एनआरसी च्या नावाखाली काही विशिष्ट तत्त्वांकडून राज्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघात व्यास यांनी केला.

अभिमानास्पद! शिवजयंतीच्या निमित्ताने बल्गेरियाचे राजदूत करणार मराठीत भाषण

'एनपीआर' तर काँग्रेसनेच आणला होता. परंतु आता मतांच्या राजकारणातून काँग्रेसकडून याला विरोध होत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर राहत आहेत. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे आणि त्यांची यादी प्रकाशित झाली पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी तत्काळ निर्देश दिले पाहिजे, अशी मागणी गिरीश व्यास यांनी केली आहे.

First published: February 18, 2020, 9:23 PM IST

ताज्या बातम्या