Home /News /maharashtra /

कुंभकर्ण असता तर त्यानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका

कुंभकर्ण असता तर त्यानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका

सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नागपूर, 28 नोव्हेंबर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षीपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'कुंभकर्ण आज असता तर आत्महत्या केली असती, की आमच्यापेक्षाही कुणी मोठा भाऊ आहे,' अशी अप्रत्यक्ष टीका सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. 'आजच्या दिवशी फडणवीसांचे सरकार गेले आणि फसविणाऱ्यांचे सरकार आले. आज सरकारचे निर्णय जर बघितले तर सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? असं विचारावासं वाटतं. महाराष्ट्रात रडणारं सरकार आहे लढणारं नाही. या सरकारविरोधात संधी मिळेल तिथे जनतेनी असंतोष व्यक्त करावा,' असं आवाहन मुनगंटीवार यांनी नागपूर इथं बोलताना केलं आहे. सुधीर मुनगंटीवारांची फटकेबाजी, पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे: - हिवाळी अधिवेशन घेणे हे आवश्यक आहे पण नागपुरात कोरोना आहे. नागपुरात अधिवेशन घेतलं तर कोरोना होतो आणि मुंबईत घेतलं तर होत नाही...असा यांचा तर्क आहे - अजब सरकार की गजब कहाणी असं या सरकारचं आहे - एक वर्षात मुख्यमंत्री मुख्यमंत्री विदर्भात आले नाहीत - वैधानिक विकास मंडळ हे विदर्भाचं कवच कुंडल आहे, 30 एप्रिलला वैधानिक विकास मंडळाची वैधता संपली, मात्र अद्याप मुदतवाढ दिली नाही - सतत विदर्भावर अन्याय केला आहे - विदर्भ, मराठवाड्यावर हे सरकार अन्याय करत आहेत - नाना पटोले यांनी सुद्धा विदर्भात अधिवेशनाला 'नाना' म्हटले - थकबाकी काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे झाली - या सरकारला पॉलिटिकल अल्झायमर आजार झाला आहे - 68 हजार कोटींपेक्षा जास्त निधी केंद्र सरकारने राज्याला दिला आहे - मंत्री ‘खोटं बोल पण ठरवून बोल’ असं करत आहेत - हात धुवून मागे लागेल, शिंगावर घेईल असं म्हणता...पण वाघाला शिंग नसतात. तुम्ही ओळख कशाला बदलता?
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Sudhir mungantiwar, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या