• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीची लोकांना शिवीगाळ,व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीची लोकांना शिवीगाळ,व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2018 11:34 PM IST | Updated On: Aug 1, 2018 11:34 PM IST

    नागपूर, 01 आॅगस्ट : नागपुरात भाजप नगरसेविका कल्पना कुंभलकर यांच्या पतीची भररस्त्यात लोकांना अश्लील शिवीगाळ करण्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. राम कुंभलकर असं या भाजप नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. लोकांना भर रस्त्यात शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. भाज​प नगरसेविका कल्पना कुंभलकर यांचे पती प्रभागात फिरून गोंधळ घालत असून सोबतच्या नगरसेवकांना भाजपच्या नेत्यांनाच अश्लील शिवीगाळ करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. प्रभागातील सार्वजनिक जागांवर जाऊन महिलांसमोर शिविगाळ करत असल्याच व्हिडिओत दिसत आहे, शिस्त असलेल्या भारतीय जनता पार्टीचे हे शिस्त प्रिय नगरसेवक आपल्याच पक्षातील लोकांबद्दल अनुदगार काढत असतांना या व्हिडिओत दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी