मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागपूरमध्ये वकिलाने केली वकिलावर कुऱ्हाडीने हल्ला

नागपूरमध्ये वकिलाने केली वकिलावर कुऱ्हाडीने हल्ला

 हल्ला करणाऱ्या वकिलाने विष प्राशन करून आत्महत्या केली.

हल्ला करणाऱ्या वकिलाने विष प्राशन करून आत्महत्या केली.

हल्ला करणाऱ्या वकिलाने विष प्राशन करून आत्महत्या केली.

    प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

    नागपूर, 21 डिसेंबर : नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात भरदिवसा एका वकिलाने दुसऱ्या वकिलावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात वकील गंभीर जखमी झाले असून कोमात गेले आहे. हल्ला करणाऱ्या वकिलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनं नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.

    संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नॅशनल काॅलेजच्या समोर असलेल्या फुटपाथवर 62 वर्षीय अॅड. सदानंद नारनवरे यांच्यावर आरोपी वकील लोकेश मुकेश भास्करने कुऱ्हाडीनं हल्ला केला होता. लोकेश भास्करने न्यायालयात येत असताना सोबत कुऱ्हाड आणली होती. नारनवरे न्यायालयातून बाहेर आले असता मुकेश भास्करने त्यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केला. नारनवरे यांच्या मानेवर कुऱ्हाडीनं वार केल्यामुळं ते जागेच कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून ते कोमात गेले आहे.

    हल्ला केल्यानंतर तिथे उपस्थितीत असलेल्या नागरिक आणि पोलिसांनी लोकेश भास्करला पकडलं होतं. परंतु, त्यानं तितक्यात विष प्राशन केलं. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    आरोपी मुकेश भास्कर हा भंडारा येथील रहिवासी होता.

    त्याने नारनवरे यांच्यावर का हल्ला केला आणि त्यानंतर स्वत: का आत्महत्या केली हे अद्याप कळू शकलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

    =================

    First published:
    top videos