नागपूर, 3 मार्च : नागपूरच्या मानकापूर भागात एका चार मजली इमारतीवरून उडी मारून तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 24 वर्षीय अंकिता माकोडे असं या तरुणीचं नाव आहे. इमारतीवरून उडी मारून तरुणीने केलेल्या आत्महत्येच्या घटनेनं मानकापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
मानकापूर भागात ही तरुणी आणि तिचा मित्र सौरभ वसुले यांची आज दुपारी भेट झाली. भेटीदरम्यान दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. त्यामुळं तरुणीने रागाच्या भरात इमारतीवरून उडी मारली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. प्रेम प्रकरणातून किंवा एकतर्फी प्रेमातून तिने आत्महत्या केली का? या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत.
या आत्महत्येमुळे तरुणीच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच तिच्या कुटुंबाने मोठा आक्रोश केला. या तरुणीने नेमकं कोणत्या कारणामुळे इतकं टोकाचं पाऊल उचललं, याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा-विकृतीची हद्द! 90 वर्षांच्या महिलेवर त्यानं केला बलात्कार आणि पकडले जाण्याच्या भयानं जीवही घेतला
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रेमप्रकरण आणि त्यातून होणाऱ्या हत्या-आत्महत्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. प्रेमप्रकरणातील वाद किंवा एकतर्फी प्रेमातून तरुणी-तरुणी टोकाचं पाऊल उचलत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.