4 दिवसात 1616 ग्राहकांना महावितरणाचा झटका, वीज कनेक्शन कापल्यामुळे नागपूरकरांमध्ये नाराजी

4 दिवसात 1616 ग्राहकांना महावितरणाचा झटका, वीज कनेक्शन कापल्यामुळे नागपूरकरांमध्ये नाराजी

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नागपूरमध्ये महावितरणकडून ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची धडक मोहीम सुरू आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये शहरातील 1616 ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे.

  • Share this:

नागपूर, 12 फेब्रुवारी: ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या नागपूरमध्ये महावितरणकडून ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची धडक मोहीम सुरू आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये शहरातील 1616 ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. कोरोना काळात (Corornavirus Pandemic) या ग्राहकांना वीज बिलात सूट देण्यात आली होती, आता या सर्व ग्राहकांवर जवळपास 3 कोटीपेक्षाही जास्त वीज बील (electricity bill) थकीत होते. त्यामुळे हे थकित बिल भरणाऱ्यांची वीज कापण्याची धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे. दरम्यान महावितरणकडून दररोज 500 हून अधिक वीज कनेक्शन कापण्याचे नियोजन आहे, अशी माहिती समोर येते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री यांनी वीजबिल बिलात सूट देण्याचा शब्द दिला मात्र ग्राहकांना त्याचा कोणताही दिलासा मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही बील न भरणारे 14 लाख कनेक्शन तोडणार!

1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्याचे निर्देश महावितरणचे (MSEDCL) पुणे प्रादेशिक संचालकांनी दिले आहे. महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील सोय केलेली आहे, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.

(हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीला झळाळी, इथे तपासा नवे दर)

महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधून देखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे महावितरणाकडून राज्यात कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जात आहे, असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 12, 2021, 7:41 AM IST

ताज्या बातम्या