मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुशांतच्या प्रेमासाठी 14 वर्षांच्या चाहत्यानं उचललं टोकाचं पाऊल? घरात आढळला फॅनला लटकलेला मृतदेह

सुशांतच्या प्रेमासाठी 14 वर्षांच्या चाहत्यानं उचललं टोकाचं पाऊल? घरात आढळला फॅनला लटकलेला मृतदेह

नयन मगनानी या नुकताच नववीत गेलेल्या 14 वर्षाच्या मुलाने घरातील सिलिंग फॅनला लटकून गळफास घेतला आहे. नयन दिवंगत अभिनेता सुशांतचा फॅन होता आणि त्याच्या जाण्याने तो खूप तणावामध्ये  होता अशी माहिती समोर येत आहे.

नयन मगनानी या नुकताच नववीत गेलेल्या 14 वर्षाच्या मुलाने घरातील सिलिंग फॅनला लटकून गळफास घेतला आहे. नयन दिवंगत अभिनेता सुशांतचा फॅन होता आणि त्याच्या जाण्याने तो खूप तणावामध्ये होता अशी माहिती समोर येत आहे.

नयन मगनानी या नुकताच नववीत गेलेल्या 14 वर्षाच्या मुलाने घरातील सिलिंग फॅनला लटकून गळफास घेतला आहे. नयन दिवंगत अभिनेता सुशांतचा फॅन होता आणि त्याच्या जाण्याने तो खूप तणावामध्ये होता अशी माहिती समोर येत आहे.

नागपूर, 26 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देशभरातून सुन्न करणाऱ्या घटना समोर येत आहेत. बुधवारी नागपूरमधून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. नयन मगनानी या नुकताच नववीत गेलेल्या 14 वर्षाच्या मुलाने घरातील सीलिंग फॅनला लटकून गळफास घेतला आहे. शहरातील जरीपटका परिसरातील हेमू कॉलनी चौक याठिकाणी ही घटना घडली. नयन दिवंगत अभिनेता सुशांतचा फॅन होता आणि त्याच्या जाण्याने तो खूप तणावामध्ये  होता अशी माहिती समोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने  या संदर्भात वृत्त दिले आहे.

नयनचे वडील इंद्रकुमार या घटनेनंतर पूर्णपणे कोलमडले आहेत. त्यांनी अशी माहिती दिली की सुशांतच्या आत्महत्येनंतर तो वारंवार त्या घटनेबाबत बोलत असे की. त्याच्या वडिलांनी अशी माहिती दिली की त्यांनी अनेकदा नयनचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा तसंच जेव्हा सुशांत संबंधित बातम्या न्यूज चॅनलवर यायच्या त्यावेळी त्याला टीव्हीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नयनला असे देखील म्हटले होते की अभिनेत्याने आत्महत्या केली नसून त्याच्या मृत्यूमागे काही तरी काळंबेरं आहे. वृत्तपत्राला त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

(हे वाचा-सुशांतची ती इच्छा अपूर्णच, 'छिछोरे'च्या दिग्दर्शकांना सांगितली होती मनातली गोष्ट)

मीडिया अहवालानुसार इंद्रकुमार यांचा इमारत बांधकामासाठी वस्तू पुरवण्याचा व्यवसाय होता. त्यांनी अशी माहिती दिली होती की, नयनची आई त्याला नवीन मोबाइल घेण्यावरून ओरडली होती. त्यानंतर तो काहीसा निराश होता. त्याचा सध्याचा फोन खराब झाल्यामुळे त्याला नवीन फोन हवा होता. नयनच्या कुटुंबीयांशी संबधित सूत्रांनी अशी माहिती दिली की नयन कायम व्हिडीओ गेम खेळत असायच्या, ज्याला नयनच्या आईचा विरोध होता.  त्याचप्रमाणे नयन आणि त्याच्या बहिणीचे कायम खटके उडत असत. इंद्रकुमार पुढे म्हणाले की, हा सारा प्रकार घडला तेव्हा ते दुकानात होते. नयनच्या बहिणीने त्याच्या आईला आणि तिने इंद्रकुमार यांना याबाबत माहिती दिली. त्यांच्या मते नयन अशी काही गोष्ट करणाऱ्यांपैकी नव्हता.

मीडिया अहवालानुसार पोलिसांना त्याच्या घरामध्ये कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही आहे. जरीपटका पोलीस स्थानकात अपघाती मृत्यूची  नोंद करण्यात आली आहे.

(हे वाचा-ऑनलाइन रिलीज होणार सुशांतचा शेवटचा चित्रपट; चाहते म्हणाले...)

दरम्यान देशभरात विविध घटनांमध्ये अल्पवयीन मुलांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर स्वतःचं आयुष्यही संपवल्याच्या बातम्या विविध वृत्तांमध्ये आल्या आहेत.

1. पाटण्याच्या एका 17 वर्षांच्या मुलीला सुशांतची बातमी ऐकल्यानंतर धक्का बसला. तिला दहावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने अगोदरपासूनच ती नैराश्यग्रस्त होती. त्यात सुशांतची बातमी ऐकली तेव्हापासून ती फक्त त्याच्याचबद्दलच्या बातम्या पाहात आणि वाचत होती. तिने आईच्या साडीपासून केलेल्या फासाला लटकून आत्महत्या केली.

2. विषाखापट्टणमच्या एक 21 वर्षीय तरुणी सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यापासून बेचैन होती. ती एका खासगी शाळेत शिक्षिकेची नोकरी करते. पण सुशांत गेल्याची बातमी ऐकल्यानंतर ती नैराश्यात गेली. ती वारंवार त्याच्या VIDEO क्लिप्स बघत होती. अखेर तिने सीलिंगला ओढणी बांधून गळफास घेतला.

(हे वाचा-VIDEO : 'मृत्यूची भीती वाटते', हसऱ्या चेहऱ्यानेच सुशांत सिंहने दिली होती कबुली)

3. बिहारच्या नालंदा जिल्ह्यात लोदिपूर गावातल्या एका 10 वर्षांच्या मुलाने सुशांतची बातमी ऐकल्यानंतर स्वतःला फास लावून घेतला. या मुलाने आदल्या रात्रीच सुशांतचा M S Dhoni An Untold Story चित्रपट पाहिला होता. असा फास घेऊन कसा कुणाचा जीव जाऊ शकतो, असं त्याने सुशांतची बातमी पाहून आई-वडिलांना विचारलही होतं.

4. अंदमानमध्ये एका किशोरवयीन मुलीने सुशांतबद्दलच्या बातम्या वाचून स्वतःला संपवायचा निर्णय घेतला. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या पाहून तिला नैराश्य आलं. त्यानंतर अंदमान निकोबारच्या पोलीस महासंचालकांनी तिथल्या तरुणांना टोकाचं पाऊल उचलण्यापासून परावृत्त करणारं आवाहनही केलं होतं.

(हे वाचा-आत्महत्येपूर्वी सुशांत खेळत होता प्लेस्टेशनवर गेम? व्हायरल VIDEO मुळे खळबळ)

5. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर दोनच दिवसात आसाममधून एक बातमी आहे. त्याच्या पोस्टरसमोर उभी Miss You sir, अशी पोस्ट लिहित TikTok VIDEO बनवणाऱ्या एका तरुण मुलीने खरोखरच रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. श्रमिक एक्स्प्रेसमोर जीव देणाऱ्या या तरुण मुलीने आत्महत्या करण्यापूर्वीसुद्घा एक TikTok Video शेअर केला होता.

6. उत्तर प्रदेशात बरेलीतून अशीच एक धक्कादायक बातमी आली होती. सुशांतचा एक दहावीत शिकणारा फॅन त्याच्या आत्महत्येच्या बातमीने प्रचंड नैराश्यात गेला. तो करू शकतो तर मी का नाही, असं लिहून ठेवत त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.

First published:

Tags: Suicide, Sushant Singh Rajput