नगरपंचायतीवर कुणाचा झेंडा ?, संपूर्ण निकाल एकाच पेजवर

नगरपंचायतीवर कुणाचा झेंडा ?, संपूर्ण निकाल एकाच पेजवर

आज राज्यातल्या नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले.

  • Share this:

12 एप्रिल : आज राज्यातल्या नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं ते कणकवली नगरपंचायतीवर..कारण नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाची सत्ता ही पहिली परीक्षा होती. तिही भाजपविरोधात. मात्र कणकवलीत स्वाभिमानने सेना भाजप युतीचा धुव्वा उडवलाय.

तर जळगावमधल्या जामनेर नगरपालिकेच्या सर्व जागा भाजपनं जिंकल्या आहेत. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. सर्व 25 जागा भाजपचे उमेदवार विजयी झालेत आणि त्यातले 7 उमेदवार मुस्लीम आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना महाजन जवळपास 9 हजार मतांनी विजयी झाल्यात. गिरीश महाजन यांनी सर्व पक्षांना धोबीपछाड दिलाय.  राज्यातल्या नगरपंचायतीवर कुणाचा झेंडा फडकला त्यावर एक नजय टाकुया....

नगरपंचायतीवर कुणाचा झेंडा

कणकवली

 नगराध्यक्ष - महाराष्ट्र स्वाभिमानचे समीर नलावडे  

एकूण जागा - 17

महाराष्ट्र स्वाभिमान - 10

भाजप - 3

शिवसेना - 3

राष्ट्रवादी काँग्रेस - 1

कोल्हापूर (आजरा)

 नगराध्यक्ष - भाजपच्या ज्योत्स्ना चराटी  

एकूण जागा - 17

आजरा विकास आघाडी - 9

राष्ट्रवादी काँग्रेस - 6

परिवर्तन पॅनल - 1

अपक्ष - 1

रत्नागिरी (देवरुख)

- नगराध्यक्ष - भाजपच्या मृणाल शेट्ये  

एकूण जागा - 17

शिवसेना - 3

भाजप - 7

मनसे - 1

राष्ट्रवादी काँग्रेस - 3

काँग्रेस - 2

बिनविरोध - 1

रत्नागिरी (गुहागर)

- नगराध्यक्ष - शहर विकास आघाडीचे राजेंश बेंडल

एकूण जागा - 17

शहर विकास आघाडी - 9

राष्ट्रवादी काँग्रेस - 1

शिवसेना - 1

भाजप - 6

जळगाव (जामनेर)

 - नगराध्यक्ष - भाजपच्या साधना महाजन

भाजपचा व्हाईट वॉश

एकूण जागा - 25

भाजप - 25

औरंगाबाद (वैजापूर)

 - नगराध्यक्ष - भाजपच्या शिल्पा दिनेश परदेशी

एकूण जागा - 23

भाजप - 9

शिवसेना - 13

काँग्रेस - 1

First published: April 12, 2018, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading