सचिन जाधव, प्रतिनिधी
सातारा, 9 मार्च : महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला पाठिंबा दिला. नागालँडमध्ये एनडीपीपीला 25 आणि भाजपला 12 जागांवर विजय मिळवला. 60 जागांच्या या विधानसभेत एनडीपीपी-भाजपला आधीच स्पष्ट बहुमत मिळालेलं असतानाही राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच महाराष्ट्रामध्येही असंच काही होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
उदयनराजेंचं सूचक विधान
दुसरीकडे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. नागालँड मध्ये राष्ट्रवादी आणि भाजप नं एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे असं महाराष्ट्रात होवु शकतं का या प्रश्नावर खासदार उदयनराजे यांनी मिश्कील उत्तर दिलं आहे.
'त्या बैठकीला मी नव्हतो त्यामुळे त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. तिथं जे ठरलं तसचं उद्या इथे ही ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल. यावर आपण वेट अँड वॉच करायला हवं' असं देखील उदयनराजे म्हणालेत.
नागालँडमध्ये ठरलं, तसं उद्या इथेही ठरेल, उदयनराजे भोसलेंचं सूचक विधान#Nagaland #BJP #NCP #UdyanrajeBhosale pic.twitter.com/cZeo1LrLy5
— News18Lokmat (@News18lokmat) March 9, 2023
राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष महाराष्ट्र मध्ये एकत्र येतील का असाम विचारलं असता उदयनराजेंनी हवेत उडणाऱ्या पक्षांबाबत विचारा, मात्र राजकीय पक्षाचं नको, असं बोलत पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.
नागालँडमध्ये राष्ट्रवादी-भाजप एकत्र का? शरद पवारांनी सांगून टाकलं 'अंडरस्टॅण्टिंग'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, NCP, Sharad Pawar