हेही वाचा..बंगालमध्ये अमित शाह म्हणाले, खबरदार! भारतावर हल्ला कराल तर घरात घुसून मारू याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलिसांनी नदीम लकडावाला याला शनिवारी मुंबई एअरपोर्टवर अटक केली. रविवार त्याला कोर्टात हजर केले असता त्याला 3 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात मोस्ट वाँटेड गँगस्टर एजाज लकडावाला याच्या मुसक्या आवळल्या होत्या. बिहारचा राजधानी पाटणा येथे एजाजला अटक करण्यात आली होती. नंतर त्याला मुंबईत आणण्यात आले होते. एजाज लकडावाला याच्याविरुद्ध मुंबईसह दिल्लीत जवळपास 25 गुन्हे दाखल आहेत. बेकायदा वसुली, हत्या आणि खंडणीच्या खटल्यांचा समावेश आहे. हेही वाचा.. 'सामना' रंगण्याआधी अमृता फडणवीस यांचं ट्वीट, रश्मी ठाकरेंचं केलं अभिनंदन गँगस्टर एजाज लकडावाला याच्या अटकेवर ज्वाईंट कमिश्नर संतोष रस्तोगी यांनी सांगितले होते की, त्याची मुलगी पोलिसांच्या ताब्यात होती. तिने चौकशीत सांगितले होते की, एजाज लकडावाला पाटणा येथे येणार आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून बिहारमधील जट्टनपुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एजाज याला अटक करण्यात आली. गँगस्टर एजाज लकडावाला याला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटवर्तीय मानले जाते.Mumbai Police: Anti extortion cell arrested Nadeem Lakdawala, a close aide of gangster Ejaz Lakdawala from Mumbai Airport yesterday. Nadeem was produced before a court today and has been sent to police custody till March 3rd. pic.twitter.com/38tgCCyyyt
— ANI (@ANI) March 1, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.