संमेलनाध्यक्ष अमान्य, साहित्य संमेलनाला जाऊ नका; ब्राह्मण महासंघाने महानोरांना दिली धमकी

संमेलनाध्यक्षांची निवड आम्हाला मान्य नाही, असं म्हणत तुम्ही संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ना. धों. महानोर यांना देण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी तत्काळ पोलीस संरक्षणाचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 9 जानेवारी : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून उस्मानाबादेत सुरू होत आहे. पण संमेलनाध्यक्षांची निवड आम्हाला मान्य नाही, असं म्हणत संमेलनावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन स्वागताध्यक्ष असणाऱ्या ना. धों. महानोर यांना करण्यात आलं आहे. 'साहित्य संमेलनाला जाऊ नका', अशी धमकीच ब्राह्मण महासंघाने ज्येष्ठ साहित्यक ना. धों. महानोर यांना दिली आहे. याची तातडीन दखल घेत गृहमंत्र्यांनी तात्काळ पोलिस संरक्षणाचे आदेशही दिले आहेत.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाध्यपदी निवड झाल्यानंतर समाजातील काही गटांनी त्याला विरोध केला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, महानोर यांना कोणी धमकी दिली याची चौकशी पोलिसांना करण्यास सांगितलं आहे. तात्काळ पोलिस संरक्षण देण्याचे संबंधित जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सांगितलं असल्याचं ते म्हणाले. यासंबंधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महानोर यांनी संमेलनाला जाऊ नका, असं पत्र आल्याचं मान्य केलं. पण तरीही ते उस्मानाबादला दाखल झाले आहेत.

एबीपी माझाशी बोलताना महानोर म्हणाले, "ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या नावाने पत्र आलं आहे. फादर दिब्रेटो यांची निवड सर्वानुमते झाल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही, असं सांगितल्यावरही त्यांचे उस्मानाबादला जाऊ नका सांगणारे फोन आले."

अन्य बातम्या

शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद, आता हे आमदार झाले नाराज

मनसेनं कार्यपद्धत बदलली तर.., देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट

मोदींच्या योजनांची पाकिस्तानमध्ये नक्कल, काय आहे 'हुनरमंद पाकिस्तान?'

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2020 08:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading